Home /News /national /

मोदींनी उल्लेखलेलं हवेतून पाणी तयार करणारं यंत्र खरंच आहे का? जाणून घ्या सत्य

मोदींनी उल्लेखलेलं हवेतून पाणी तयार करणारं यंत्र खरंच आहे का? जाणून घ्या सत्य

न नरेंद्र मोदींनी काही दिवसांपूर्वी डेन्मार्कच्या पंतप्रधानांशी चर्चा करताना विंड एनर्जी टर्बाईनचा वापर करून हवेतून पाणी तयार करण्याबद्दल वक्तव्य केलं होतं. त्यावर राहुल गांधी यांनी टीका केली होती. काय आहे मोदींच्या कल्पनेमागचं तथ्य?

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 9 ऑक्टोबर :  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही दिवसांपूर्वी डेन्मार्कच्या पंतप्रधानांशी चर्चा करताना विंड एनर्जी टर्बाईनचा वापर करून हवेतून पाणी तयार करण्याबद्दल वक्तव्य केलं होतं. हवेतून पाणी निर्माण करणं खरंच शक्य आहे का यावरची चर्चा आता रंगली आहे. कारण काँग्रेस नेते राहुल गांधींनी मोदींच्या या वक्तव्यानंतर टीका केली.  भाजप नेत्यांनी टर्बाईनचा वापर करून हवेतून पाणी निर्माण करण हे संशोधनाधारित सत्य असल्याचं म्हणत पंतप्रधानांची पाठराखण केली. त्यांनंतर सोशल मीडियावर याच विषयावर चर्चा  सुरू आहे. काय आहे पंतप्रधानांच्या कल्पनेमागचं सत्य? हवेतील आर्द्रता म्हणजे पाणीच असतं हे सगळ्यांना माहीत आहे, पण खरंच या आर्द्रतेचं द्रवात रुपांतर करून पाणी तयारी करणारी यंत्र भारतात वापली जातात का या प्रश्नाचं उत्तर आज आपण जाणून घेऊ या. काही दिवसांपूर्वी न्यूज 18 ने #MissionPaani अंतर्गत पाण्यासंबंधी अनेक रिपोर्ट प्रसिद्ध केले होते. खरं सांगायचं तर हवेतून पाणी तयार करायचं तंत्रज्ञान अस्तित्वात आहे. तशी घरगुती आणि मोठ्या प्रमाणावर जलनिर्मिती करणारी यंत्रही भारतात तयार होतात आणि वापरलीही जातात. या तंत्रज्ञानाला अटमॉस्फियरिक वॉटर जनरेशन आणि यंत्राला अटमॉस्फियरिक वॉटर जनरेटर (Atmospheric water generator) म्हणतात. चेन्नईमध्ये अशी यंत्र वापरली जातात. यातून खरोखरच पाणी तयार होतं आणि शुद्ध प्यायचं पाणीही तुम्हाला मिळतं. हे सोपं वाटत असलं तरीही हे एखाद्या चमत्काराहून कमी नाही. जाणून घ्या याबद्दल अधिक माहिती... हे तंत्रज्ञान आणि यंत्र काय आहे? तुम्ही हवेतील आर्द्रता हा शब्द अनेकदा ऐकला असेल. ही आर्द्रताच द्रव स्वरूपात आणणारं हे तंत्रज्ञान आहे. विजेवर चालणाऱ्या या यंत्रामध्ये कॉइल्स असतात. त्यांच्या मदतीनी हवेतील आर्द्रता कंडेन्स करून त्याला द्रवरूप दिलं जातं. यंत्रातील गाळण्यांतून ते गाणी पिण्यायोग्य शुद्ध होतं. भारतात ही यंत्र कधी आली? देशात 2005 मध्ये पहिल्यांदा वॉटरमेकर कंपनीनी अशी यंत्र तयार करायला सुरुवात केली. ही कंपनी सुरू करणाऱ्या मेहर भंडारा यांनी एका मीडिया समूहाला सांगितलं की सुरुवातीला खूप त्रास झाला पण गेल्या तीन वर्षांपासून ही यंत्र विकली जात आहेत. ही कंपनी घरं, शाळा आणि दवाखान्यांमध्ये  हवेतून पाणी काढणाऱ्या यंत्रांचा पुरवठा करते. तसंच कोलकात्यातील अशाच एक्वो या कंपनीचे प्रमुख नवकरण बग्गा म्हणाले, ‘या यंत्रामुळे तुम्हाला पाण्याचा एक स्वतंत्र स्रोत उपलब्ध होतो.’ हैदराबादमध्ये में मैत्री एक्वाटेकने या यंत्राला मेघदूत नाव दिलं आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्सबरोबर करार करून अशी एक लाख यंत्र तयार करण्याची जबाबदारी मैत्रीनी स्वीकारली आहे. सामान्यांना कधी मिळतील ही यंत्र सध्या कॉर्पोरेट्स व लडाखसारख्या ठिकाणी लष्करातील जवानांसाठी या यंत्रांचा वापर केला जातो. पण, जल संकटामुळे जनतेपर्यंत ही यंत्र पोहोचवण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. आता 25 ते 100 लिटर पाणी तयार करणारी यंत्र तयार केली जात आहेत जी घरांत वापरता येतील अशी असतील. यंत्रांची किंमत किती? घरगुती वापरासाठी 25 ते 30 लिटर पाणी तयार करणारी यंत्र तयार केली जात आहेत. एक यंत्र 45 ते 70 हजार रुपयांना मिळू शकेल. ऑफिस, शाळा, कंपन्यांसाठी 5000 लिटर क्षमतेची यंत्र तयार होत आहेत. मैत्री कंपनीच्या 1000 लिटर क्षमतेच्या यंत्राची किंमत साधारण 10 लाख रुपये आहे. हवा प्रदूषित असेल तर पाणी कसं शुद्ध? हवा प्रदूषित असेल तर तयार होणारं पाणी पिण्यायोग्य शुद्ध कसं होईल अशी शंका व्यक्त होत आहे पण यंत्र बनवणाऱ्या कंपन्यांचा दावा आहे की या यंत्रात पाणी गाळण्यासाठी पाच प्रकारचे फिल्टर बसवले आहेत त्यामुळे पाणी पिण्यायोग्य होतं. हवेत आर्द्रता रहावी एवढीच अपेक्षा करू या. ही यंत्र वापरल्यावर तुम्हाला पाण्याचा स्वतंत्र स्रोत मिळेल पण पाणी मिळवण्यासाठी एक अटही आहे ती अशी की हवेत 20 टक्क्यांहून अधिक आर्द्रता असेल तेव्हाच यंत्र पाणी तयार करेल त्यापेक्षा कमी आर्द्रता असेल तर पाणी तयार होणार नाही. मैत्री कंपनीचे एमडी रामकृष्णन म्हणाले, ‘ ही यंत्र ही भविष्यातील वास्तव आहे.’ त्याचं म्हणणं आहे की आफण वातावरणातील केवळ 0.1 टक्का आर्द्रताही रूपांतरित करू शकलो तरीही सर्वांना प्यायला पुरेसं पाणी उपलब्ध होईल.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Narendra modi

    पुढील बातम्या