Home /News /national /

'घराघरांत विवेकानंदांची प्रतिमा लावा, तर पुढील 35 वर्षे राहिल भाजप सरकार'; मुख्यमंत्र्यांचा खळबळजनक दावा

'घराघरांत विवेकानंदांची प्रतिमा लावा, तर पुढील 35 वर्षे राहिल भाजप सरकार'; मुख्यमंत्र्यांचा खळबळजनक दावा

त्रिपुराचे मुख्यमंत्री आपल्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात.

    आगरतळा, 9 ऑक्टोबर : त्रिपुराचे मुख्यमंत्री आपल्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. आताही त्यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे ते बरेच चर्चेत आले आहेत. ते म्हणाले की, नॉर्थ-ईस्ट राज्यातील 80 टक्के घरांमध्ये स्वामी विवेकानंदांची प्रतिमा आणि त्यांचा संदेश भिंतीवर लावलं तर पुढील तीन दशकांपर्यंत भाजप महासत्तेत राहिल. बिप्लब देव यांनी भाजप महिला मोर्चाच्या सदस्यांना संबोधित करताना हे वक्तव्य केलं आहे. ते कार्यकर्त्यांना म्हणाले की, स्वामी विवेकानंद यांचे संदेश आणि प्रतिमा घराघरांपर्यंत पोहोचवा. ज्यातून लोकांना प्रेरित करता येईल. बिप्लब देब पुढे म्हणाले की, मी माझ्या गावी पाहिलं आहे की, लोक कम्युनिस्ट नेता ज्योति बसु, जोसेफ स्टालिन, माओ जेडॉन्ग यांचे फोटो आपल्या घरातील दिवाणखाण्यात लावतात. आपण स्वामी विवेकानंदाचे फोटो घरात लावू शकत नाही? आपली पार्टी संस्कार आणि आर्दश कायम ठेवेल. जर त्रिपुरातील 80 टक्के घरांमध्ये स्वामी विवेकानंद यांचे फोटो लावले तर आपलं सरकार पुढील 30 ते 35 वर्षांपर्यंत कायम राहिलं. जास्त बोलल्याने ऊर्जा खर्च होते यावर मुख्यमंत्री म्हणाले, स्वामी विवेकानंद यांनी सांगितलं आहे की, कमी बोला..शांत राहा आणि आपलं काम करीत राहा. जर आपण जास्त बोललो तर आपली ऊर्जा विनाकारण खर्च होते. आपली ऊर्जा खर्च होता कामा नये. हे ही वाचा-ठाकरे सरकारचे येत्या काही दिवसांत तीन विकेट पडणार, भाजप नेत्यानं केला मोठा दावा कोरोना रुग्णांना विवेकानंदाच्या पुस्तकांचे वाटप बिप्लब देब यांनी महिला मोर्चातील सदस्यांना सांगितले की, भारतीय सभ्यता आणि संस्कृती लोकांमध्ये पसरवा. यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी ऑगस्टमध्ये कोविड-19 रुग्णांसाठी स्वामी विवेकानंदाची पुस्तके वाटली होती. ते वाचून त्यांनी मानिसकरित्या मजबूत व्हावे व प्रेरित व्हावे हा प्रयत्न असल्याचे सांगितले जात आहे. त्रिपुराचे मुख्यमंत्री म्हणाले की, कोणतीही योजना सुरू करणे व ती लागू करणे यामध्ये अंतर असतं. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी त्रिस्तरीय पद्धतीची सुरुवात केली होती. मात्र ते लागू करू शकले नाही. त्याला माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी पुन्हा सुरू केलं. जेव्हा नरेंद्र मोदी सत्तेत आले तेव्हा त्यांनी पंचायती अधिक चांगल्या करण्यासाठी सरळ 80 लाखांचा फंड दिला होता.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: BJP, Tripura

    पुढील बातम्या