मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

Success Story: घटस्फोटानंतर खचली पण हार नाही मानली; आता घरात बसून कमावते महिन्याला 41 लाख

Success Story: घटस्फोटानंतर खचली पण हार नाही मानली; आता घरात बसून कमावते महिन्याला 41 लाख

घटस्फोट (Divorce) झाल्यानंतर दुःखानं खचून न जाता एका महिलेनं आपल्या मेहनतीच्या जोरावर मोठा व्यवसाय उभा (Start new business) केला आहे. आता संबंधित महिला दर महिन्याला घरात बसून जवळपास 41 लाख रुपयांची कमाई (now earns Rs 41 lac per month) करते.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

वेल्स, 14 जुलै: जीवन जगत असताना माणसाच्या आयुष्यात अनेक चढ-उतार येत असतात. जीवनात आलेल्या प्रत्येक अडचणीवर स्वार होऊन आपला प्रवास सुरू ठेवणं हेच आपल्या हातात असतं. पण आयुष्यात आलेल्या अडचणींना घाबरुन खचून न जाता त्याचा धैर्यानं सामना करणं आवश्यक असतं. अशीच एक प्रेरणादायी घटना समोर आली आहे. वेल्समध्ये राहणाऱ्या एका महिलेनं घटस्फोट (Divorce) झाल्यानंतर दुःखानं हुरळून न जाता आपल्या मेहनतीच्या जोरावर मोठा व्यवसाय उभा (Start new business) केला आहे. आता जगभरातून तिच्या वस्तूंना मागणी आहे. संबंधित महिला आता दर महिन्याला घरी बसून जवळपास 41 लाख रुपयांची कमाई (now earns Rs 41 lac per month) करते.

मिशेल मॉर्गन (Michaela Morgan) असं संबंधित 30 वर्षीय घटस्फोटीत महिलेचं नाव असून ती इंग्लंडमधील वेल्स येथील रहिवासी आहे. 2019 मध्ये मिशेलला तिच्या पतीनं घटस्फोट दिला होता. यामुळे ती पुर्णपणे खचून गेली होती. दरम्यानच्या काळात तिच्या आवडत्या कुत्र्याचंही निधन झालं होतं. त्यामुळे एकाच वेळी तिच्यावर दुहेरी आघात झाला होता. त्यामुळे बरेच दिवस ती घरात बेडवर पडून होती. तिला तिच्या घटस्फोटापेक्षा कुत्र्याचा विरह अधिक जिव्हारी लागला होता. कॅन्सरमुळे कुत्र्याचं निधन झालं होतं.

हेही वाचा-स्वत:च्याच चुकांचा केला अभ्यास; अंकिता चौधरी कठोर मेहनतीने झाल्या IAS

या दुहेरी आघातानंतर मिशेलनं दुःखाला कवटाळत न बसता, त्यावर मात केली आहे. तीन आठवडे घरात कोंडून घेतल्यानंतर मिशेलनं आपला स्वत: चा व्यवसाय करण्याता निर्णय घेतला. सध्याच्या घडीला मिशेल मॉर्गन घरात बसून जवळपास 40 हजार पाउंडची कमाई करते. भारतीय रुपयांमध्ये ही रक्कम जवळपास 41.21 लाख रुपये इतकी आहे.

हेही वाचा-UPSC मध्ये यश मिळवायचंय? पाच वर्षं अपयश सोसलेल्या अभिजित यादवचे अनुभव वाचाच

'द सन'ने दिलेल्या वृत्तानुसार, मिशेल मॉर्गननं घरात बसल्या बसल्या आर्ट वर्क करायला सुरुवात केली. त्यानंतर काही आठवड्यांची ट्रेंनिंग घेतल्यानंतर तिने डिजिटल आर्ट वर्क करायला सुरुवात केली. यानंतर स्पेशल उपकरणं खरेदी करण्यासाठी काही पैसे गुंतवले आणि आपल्या व्यवसायाला सुरुवात केली. लॉकडाऊनच्या काळात घरात बसून मिशेलनं आपला व्यवसाय वाढवला. गेल्या वर्षी एप्रिल ते जुलै महिन्यांच्या दरम्यान मिशेलनं मिमो आर्टच्या माध्यमातून 1.17 लाख पाउंड म्हणजे जवळपास 1.2 करोड रुपयांच्या ऑर्डर्स विकल्या आहेत.

First published:

Tags: England, Success story