Home /News /career /

UPSC मध्ये यश मिळवायचंय? पाच वर्षं अपयश सोसलेल्या अभिजित यादवचे अनुभव वाचाच

UPSC मध्ये यश मिळवायचंय? पाच वर्षं अपयश सोसलेल्या अभिजित यादवचे अनुभव वाचाच

5 वर्षांत केलेली तयारी आणि प्रक्रियेतून शिकलेल्या गोष्टी सारांश रूपात शेअर केल्या आहेत.

    नवी दिल्ली, 13 जुलै: 2017च्या नागरी सेवा परीक्षेत (Civil Services Exam) 653 वी रॅंक मिळवून यश संपादन करणाऱ्या अभिजित यादवचा (Abhijit Yadav) यूपीएससी (UPSC) परीक्षेचा प्रवास अतिशय खडतर होता. पाच वर्षांच्या अथक परिश्रमानंतर त्यानं या परीक्षेत यश संपादन केलं. जे उमेदवार कोरोना साथीच्या कालावधीत यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेसच्या परीक्षेसाठी तयारी करत आहेत, त्यांच्यासाठी यादवने आपण 5 वर्षांत केलेली तयारी आणि प्रक्रियेतून शिकलेल्या गोष्टी सारांश रूपात शेअर केल्या आहेत. सर्वांत कठीण मानल्या जाणाऱ्या या परीक्षेसाठी त्याने कशी तयारी केली, हे ट्विटरवर (Twitter) आपले अनुभव शेअर करताना अभिजित यादवने स्पष्ट केलं आहे. अन्य इच्छुक उमेदवारांप्रमाणेच अभिजितसुद्धा पहिल्या दोन प्रयत्नांमध्ये यूपीएससी सीएसईच्या (UPSC CSE) प्रीलिम परीक्षाही (Prelim Exam) पास होऊ शकला नाही; मात्र पूर्ण दृढनिश्चय आणि प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवून तो तिसऱ्या प्रयत्नात प्रीलिम परीक्षा पास झाला; मात्र तो मुख्य परीक्षेत यशस्वी होऊ शकला नाही. त्यानंतर तो त्याच्या चौथ्या प्रयत्नात मुख्य परीक्षेला (Main Exam) बसला. परंतु त्याला त्या वेळीही अपयश आलं. यामुळे कोणताही उमेदवार मनातून खचून गेला असता परंतु, यादवने यातूनच धडा घेतला. 'अपयशाची सवय करून घेतली पाहिजे. कारण त्यामुळे आपण योग्य ते निवडू शकतो, हा पहिला धडा मला त्यातून मिळाला. अगदी गणितीय भाषेत सांगायचं झालं तर या परीक्षेला बसणारे बहुतेक लोक अयशस्वी होतील. परंतु त्याचवेळी तुम्हाला कठोर परिश्रम म्हणजे काय असतात हे समजेल. तुमच्यात धैर्य आणि चिकाटी विकसित होईल. अपयशानंतर तुम्ही स्वतःला सिद्ध करण्यासाठी पुन्हा उभे राहू शकाल,' असं अभिजित ट्विटमध्ये लिहितो. हे वाचा - Success Story: देशातील सर्वात मोठा IPO आणणारी कंपनी Paytm ची यशोगाथा यातून मिळालेला दुसरा धडा म्हणजे, दीर्घकालीन यशासाठी शारीरिक, मानसिक आणि भावनिक स्वाथ्य (Health) फार महत्त्वाचं असते. त्यामुळे स्वाथ्य चांगलं राहावं यासाठी प्रयत्न करा. आपलं शारीरिक आरोग्य आपलं मानसिक आणि भावनिक स्वाथ्य निश्चित करतं. त्यामुळे यूपीएससी किंवा इतर कोणत्याही परीक्षेसाठी अभ्यास करत असताना आपलं उद्दिष्ट निश्चित करा. दीर्घकालीन यशासाठी आपलं आरोग्य चांगलं राखा, असं अभिजित सांगतो. 'यातून मिळालेला तिसरा धडा म्हणजे, ही सर्व प्रक्रिया मी एन्जॉय केली. यातल्या कोणत्याही गोष्टीचा फार तणाव मी घेतला नाही,' असं अभिजित सांगतो. 'रिझल्टवर फार लक्ष केंद्रीत न करता, ही सर्व प्रक्रिया एन्जॉय करा. यामुळे तुम्ही सहजतेनं अभ्यास करू शकाल आणि तुम्ही परीक्षेत अनुत्तीर्ण झालात तर त्याचा जास्त तणाव तुम्हाला जाणवणार नाही. जेव्हा तुमची निवड होईल तेव्हा हवेत न जाता जमिनीवरच राहा,' असंही अभिजितने सांगितलं आहे. तो पुढे म्हणतो, की यूपीएससी सीएसईची तयारी करताना विकसित केलेली कौशल्यं (Skills) उमेदवार परीक्षा उत्तीर्ण झाला अथवा न झाला, तरी ती त्याला कायम उपयोगी पडतात. या तयारीच्या काळात स्वतःमध्ये धैर्य, हिंमत, तसंच जगात सकारात्मक बदल घडवण्यासाठी नवी दृष्टी विकसित होत असते. यूपीएससी प्रीपरेशन (UPSC Preparation) हा म्हणजे जीवनाशी डीलिंग करण्याचा एक छोटासा कोर्स असतो. यातून आयुष्यात संधीची भूमिका किती महत्त्वाची आहे, मोठ्या स्वप्नांच्या मागे धावताना कृती देखील मोठी असावी, हे शिकायला मिळतं, असं अभिजित लिहितो. बहुतेक सर्वच लोक बोलतात, पण कृती करत नाहीत. अशा लोकांवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका, 'कदाचित अन्य कोणी फारशा अडचणी न येता यशस्वी होताना दिसतात. तुमच्या प्रवासात तुम्ही एकटेच आहात. त्यामुळे दुसऱ्याशी तुलना करू नका. भूतकाळात तुम्ही कसे होतात, याच्याशीच फक्त तुमची तुलना असावी. प्रत्येकाच्या अपेक्षा सोबत घेऊन राहणं अवघड असतं त्यामुळे तुम्ही फक्त तुमच्या अपेक्षांसोबत राहा,' असे हा आयआयटी दिल्लीचा पदवीधर लिहितो. हे वाचा - किती वेळा Password बदलणं योग्य? Google च्या सुंदर पिचईंनीच सांगितलं लवकरच यूपीएससी सीएसई 2021ची परीक्षा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर अभिजितचे हे अनुभव उमेदवारांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरतील. अभिजितला सेवेत रुजू व्हायचं होतं; मात्र तोपर्यंत आलेल्या अपयशाने आयुष्याबद्दल त्याला खूप काही शिकवले. अभिजित सध्या 'पेन्सिल' (Pencil) नावाच्या प्लॅटफॉर्मची उभारणी करत आहे. हा प्लॅटफार्म स्वतंत्रपणे काम करणाऱ्या शिक्षकांना ऑनलाइन शिकवता येण्यासाठी मदत करणार आहे.
    First published:

    Tags: Career opportunities, Success story, Upsc exam

    पुढील बातम्या