Home /News /pune /

कोरोनाला रोखण्यासाठी पुण्यात होणार 'प्लाझ्मा थेरेपी', ICMRने घेतला मोठा निर्णय

कोरोनाला रोखण्यासाठी पुण्यात होणार 'प्लाझ्मा थेरेपी', ICMRने घेतला मोठा निर्णय

Health workers prepare to screen residents of a building under lockdown during the Movement Control Order in Kuala Lumpur, Malaysia, Thursday, April 9, 2020. The Malaysian government issued a restricted movement order to help curb the spread of the new coronavirus. (AP Photo/Vincent Thian)

Health workers prepare to screen residents of a building under lockdown during the Movement Control Order in Kuala Lumpur, Malaysia, Thursday, April 9, 2020. The Malaysian government issued a restricted movement order to help curb the spread of the new coronavirus. (AP Photo/Vincent Thian)

थेरेपी हा काही कोव्हिड-19 वरचा उपाय नाही. मात्र शेवटच्या स्टेजमध्ये असलेल्या रुग्णांना वाचविण्यासाठी याचा वापर करण्यात येणार आहे.

    पुणे 03 मे :  कोरोना बाधित रुग्णांमध्ये मुंबई आणि पुणे देशात आघाडीवर आहेत. रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. देशातल्या अन्य राज्यांपेक्षा सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहे. त्यामुळे सरकारची चिंता वाढली आहे. मृत्यूदर कमी कमी करण्यासाठी सरकारकडून आणखी उपायोजना केल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर Indian Council of Medical Research म्हणजेच ICMRने पुण्यात प्लाझ्मा थेेरेपीचा प्रयोग करण्याची परवानगी दिल्याची माहिती राज्य सरकारचे आरोग्य सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे यांनी आज दिली. ते म्हणाले, प्लाझ्मा थेरेपी हा काही कोव्हिड-19 वरचा उपाय नाही. मात्र शेवटच्या स्टेजमध्ये असलेल्या रुग्णांना वाचविण्यासाठी याचा वापर करण्यात येणार आहे. कोरोनामुक्त झालेल्यांच्या शरिरात कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी अँटीबॉडीज तयार झालेल्या असतात. त्याचा उपयोग कोरोनाविरुद्ध करण्यासाठी जी पद्धत आहे त्यालाच प्लाझ्मा थेरेपी असं म्हटलं जातं. आपला प्लाझ्मा दान करण्यासाठी 35 जणांनी इच्छ व्यक्त केली आहे. त्यांच्याशी संपर्क करून पुढच्या एक दोन दिवसांमध्ये याचा प्रयोग करण्यात येणार आहे. रक्तामधून प्लाझ्मा वेगळा करण्यासाठी पुण्यात मशिनही घेण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली. Coronavirus बाबत जागतिक स्तरावर भारताची नेमकी काय आहे परिस्थिती? ICMRयाबाबत अभ्यास करत असून ही थेरेपी वापरायला सरसकट परवानगी दिलेली नाही. प्रयोग केल्यानंतर त्याचा आढावा घेऊन याबाबत नियम ठरविण्यात येणार आहेत. देशात कोरोनाचा उद्रेक वाढतोच आहे. दररोज रुग्णांची संख्या वाढते आहे. अशा स्थितीत भारताने तब्बल 10 लाख कोरोना टेस्टचा टप्पा ओलांडला आहे. आत्तापर्यंत 10 लाख टेस्ट केलेल्या विकसित देशांपेक्षा भारताची कामगिरी चांगली असल्याचं आढळून आलं आहे. ज्या मोठ्या 5 देशांनी 10लाख टेस्ट केल्यात त्यांच्या तुलनेत भारतातल्या रुग्णांची संख्या कमी आहे. भारतातल्या रुग्णांचा आकडा 40 हजारांच्या जवळ गेला आहे. अर्थव्यवस्थेची गाडी रूळावर आणण्यासाठी लागणार वर्षापेक्षा जास्त कालावधी-सर्व्हे तर आत्तापर्यंत 1301 जणांचा मृत्यू झाला आहे. तर आत्तापर्यंत 10,633 जण बरे झाले आहेत. लॉकडाऊनमुळे कोरोनाला रोखण्यात मोठ्या प्रमाणावर यश आल्याचंही बोललं जात आहे. भारतात मृत्यू तर हा 3.2 एवढा असून इतर देशांच्या मानाने तो चांगला असल्याचं मानलं जात आहे. ज्या मोठ्या 5 देशांनी 10लाख टेस्ट केल्यात त्यांच्या तुलनेत भारतातल्या रुग्णांची संख्या कमी आहे. भारताने 10 लाख टेस्ट केल्यानंतर 39,980 रुग्ण आढळून आलेत. तर 10 लाख टेस्टनंतर अमेरिकेत 1,64,620, जर्मनीमध्ये 73,522, स्‍पेनमध्ये 2,00,194 तुर्कीमध्ये 1,17,589 इटलीत 1,52,271 रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे भारताची स्थिती चांगली असल्याचं बोललं जात आहे.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या