जाहिरात
मराठी बातम्या / कोरोना / Corona Spread : 'या' देशात कोरोनाची स्थिती पुन्हा गंभीर, घराबाहेर पडण्यासही बंदी

Corona Spread : 'या' देशात कोरोनाची स्थिती पुन्हा गंभीर, घराबाहेर पडण्यासही बंदी

Corona Spread : 'या' देशात कोरोनाची स्थिती पुन्हा गंभीर, घराबाहेर पडण्यासही बंदी

सर्व मॉल्स, शॉपिंग सेंटर्समध्ये नागरिकांच्या प्रवेशावर निर्बंध घालण्यात आले आहेत. नागरिकांना घराच्या कम्पाउंडबाहेर पडण्याची परवानगी नाही.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 21 एप्रिल : ज्या चीनमधून दोन वर्षांपूर्वी जगभरात कोरोना विषाणूचा (Corona Spread) फैलाव झाला, त्या चीनमध्ये आता कोरोनाचा प्रसार पुन्हा एकदा नियंत्रणाबाहेर चालला आहे. अन्य जगभरात कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात येत असताना, चीनमध्ये मात्र परिस्थिती हाताबाहेर चालली आहे. चीनमधल्या शांघाय (Shanghai) शहरात कोरोनामुळे हाहाकार माजला आहे. त्यामुळे नागरिकांना घराच्या कम्पाउंडच्या बाहेर जाण्यासही मज्जाव केला जात आहे. एवढे निर्बंध असूनही शांघायमध्ये बुधवारी (20 एप्रिल) 18,495 नवे कोरोनाबाधित आढळले. त्यापैकी 15,861 जणांना लक्षणं नाहीत, तर 2634 जण लक्षणं दिसणारे आहेत. स्थानिक प्रशासनाने कोरोनाच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी झीरो ट्रान्समिशन धोरण (Zero Transmission Policy) अवलंबलं आहे. शांघाय शहरात कोविड-19मुळे (Covid-19) आणखी आठ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे चीनमधल्या पूर्वेकडच्या या महानगरातल्या कोरोना मृत्यूंची संख्या वाढून 25 झाली आहे. चीनमधल्या (Corona in China) कोरोनाचा खूप प्रसार झालेल्या शहरांमध्ये एक प्रकारे नाकेबंदीच करण्यात आली आहे. रस्ते सुनसान आहेत आणि परवानगी घेतल्याशिवाय कोणालाच घराच्या आवाराच्या बाहेर पडता येत नाही. आवश्यक ते सामान आणण्यासाठी एका परिवारातून एका दिवशी एकच व्यक्ती घराबाहेर पडू शकते. कोरोनाचा संसर्ग झाला, तर क्वारंटाइन सेंटरमध्ये ठेवण्यात येतं. अनेक नागरिकांच्या घरात खाण्या-पिण्याच्या वस्तूंची टंचाई निर्माण झाली आहे. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, जिंगानमधल्या सेंट्रल डिस्ट्रिक्टमध्ये सर्व मॉल्स, शॉपिंग सेंटर्समध्ये नागरिकांच्या प्रवेशावर निर्बंध घालण्यात आले आहेत. नागरिकांना घराच्या कम्पाउंडबाहेर पडण्याची परवानगी नाही. चोंगमिंगचे डेप्युटी गव्हर्नर झांग झिटोंग यांनी सांगितलं, की सुपरमार्केटपासून छोट्या दुकानांपर्यंत सर्व काही बंद करण्यात आलं आहे. मंजुरीशिवाय एकाही वाहनाला रस्त्यावर येता येत नाही. एका दिवशी कुटुंबातल्या एकाच व्यक्तीला शहरात जाण्याची परवानगी आहे. कोरोनाबाधितांना क्वारंटाइन केंद्रात ठेवलं जात आहे. त्या व्यतिरिक्त 441 कोरोनाबाधित क्वारंटाइनच्या बाहेर आहेत. हे ही वाचा- Omicron XE व्हेरिएंटचा लहान मुलांना सर्वाधिक धोका, ‘या’ लक्षणांपासून सावध रहा चीनच्या राष्ट्रीय स्वास्थ आयोगाच्या म्हणण्यानुसार, चीनमध्ये कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन (Omicron Variant) व्हॅरिएंटचा संसर्ग झालेल्या 19,300 व्यक्ती आढळल्या आहेत. डिसेंबर 2019मध्ये कोविड-19चा पहिला रुग्ण चीनमध्ये आढळला होता. तेव्हापासून चीनमध्ये कोरोनामुळे 4663 जणांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी (20 एप्रिल) चीनमध्ये कोविड-19चे 19,832 नवे रुग्ण आढळले. त्यापैकी बहुतांश रुग्ण शांघायमधले होते. या रुग्णांपैकी 2830 व्यक्तींमध्ये कोणतंही लक्षण दिसत नव्हतं. तरीही त्यांच्यावर ठरलेल्या हॉस्पिटल्समध्येच उपचार केले जाणार आहेत. आयोगाच्या अहवालानुसार, शांघायव्यतिरिक्त 17 अन्य प्रांतांमध्ये कोविड-19चे नवे रुग्ण आढळले आहेत. त्यात ईशान्येकडच्या जिलिन (Jilin) प्रांतातल्या 95 आणि बीजिंगमधल्या एका रुग्णाचा समावेश आहे. चीनमध्ये 20 एप्रिलपर्यंतच्या स्थितीनुसार 31,421 रुग्णांवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. दरम्यान, ज्येष्ठ नागरिकांमध्ये लसीकरणाचं प्रमाण कमी असल्यामुळे शांघायमध्ये गेल्या काही दिवसांत कोविडमुळे होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण वाढलं आहे, असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. तज्ज्ञांचं म्हणणं आहे, की हा देशासाठी एक गंभीर इशारा आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणाचं प्रमाण कमी असल्यामुळे चीनमध्ये कोविड निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात अडचणी येत आहेत, असं त्यांचं म्हणणं आहे. शांघायच्या अधिकाऱ्यांनी 15 एप्रिल रोजी सांगितलं होतं, की शांघायमधल्या 60 वर्षांवरच्या 36 लाख नागरिकांपैकी केवळ 62 टक्के नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे. 80 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या व्यक्तींपैकी केवळ 15 टक्के नागरिकांचं लसीकरण झालं आहे. बूस्टर डोस केवळ 38 टक्के नागरिकांनीच घेतला आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात