मराठी बातम्या /बातम्या /विदेश /अफगाणिस्तानातील शिखांच्या मदतीला भारताची धाव, केंद्र सरकार देणार खास सवलत

अफगाणिस्तानातील शिखांच्या मदतीला भारताची धाव, केंद्र सरकार देणार खास सवलत

अफगाणिस्तान जीव मुठीत धरून जगणाऱ्या शिखांच्या मदतीला भारतानं धाव घेतली आहे. या नागरिकांसाठी सरकारनं खास सवलत देण्याचा निर्णय घेतलाय.

अफगाणिस्तान जीव मुठीत धरून जगणाऱ्या शिखांच्या मदतीला भारतानं धाव घेतली आहे. या नागरिकांसाठी सरकारनं खास सवलत देण्याचा निर्णय घेतलाय.

अफगाणिस्तान जीव मुठीत धरून जगणाऱ्या शिखांच्या मदतीला भारतानं धाव घेतली आहे. या नागरिकांसाठी सरकारनं खास सवलत देण्याचा निर्णय घेतलाय.

मुंबई, 19 जून : अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील गुरूद्वारात दहशतवादी हल्ला (Gurudwara Karte Parwan in Kabul under attack) करण्यात आला. या हल्ल्यानंतर तेथील शिखांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अफगाणिस्तान जीव मुठीत धरून जगणाऱ्या शिखांच्या मदतीला भारतानं धाव घेतली आहे. या स्फोटानंतर तेील शिखांना ई व्हिसा (E Visa) देण्यााचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. सरकारी सूत्रांनी दिलेल्या मदतीनुसार आत्तापर्यंत 100 व्हिसा जारी करण्यात आले आहेत. मागच्या वर्षी ऑगस्ट महिन्यात काबूलवर तालिबाननं ताबा मिळवल्यानंतरही गृहमंत्रालयानं ई व्हिसा जारी केले होते.

अज्ञात सशस्त्र हल्लेखोरांनी शनिवारी सकाळी अफगाणिस्तानच्या राजधानीतील गुरुद्वारा कार्ते परवानमध्ये प्रवेश करत हल्ला केला. या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला तर सात जण जखमी झाले. अफगाणिस्तानच्या सुरक्षा रक्षकांनी स्फोटकांनी भरलेली एक गाडी गुरूद्वाराच्या जवळ अडवल्यानं मोठा अनर्थ टळला.

काबूलमधील दहशतवादी हल्ल्याचा भारतानं तीव्र निषेध केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) याबद्दल खास ट्विट करून त्यांच्या भावना व्यक्त केल्या. 'काबूलमधील कार्ते परवान गुरूद्धारावर झालेल्या भ्याड हल्ल्यामुळे मी निशब्द आहे. या हल्लाचा मी निषेध करतो तसंच भाविकांची सुरक्षेसाठी मी प्रार्थना करतो.' असे मोदींनी या ट्विटमध्ये म्हंटले आहे.

अग्निपथ योजना: 1 कोटीचा विमा, कॅन्टीन सुविधा, 30 दिवसांची सुट्टी आणि बरंच काही! हवाई दलाने शेअर केले डिटेल

केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनीही या हल्ल्याचा निषेध करत अफगाणिस्तानमधील घडामोडींवर भारताचं बारीक लक्ष असल्याचं स्पष्ट केलं होतं. इंडियन वर्ल्ड फोरमचे अध्यक्ष पुनीत सिंग चंधोक यांनीही या हल्ल्यानंतर शिखांना तातडीनं मायदेशी परत येण्याचं आवाहन केलं होतं.

First published:

Tags: Afghanistan, India, Kabul, Terrorist attack