नवी दिल्ली 19 जून : अग्निपथ योजनेतील (Agnipath Scheme) अग्निवीरांच्या भरतीसाठी हवाई दलाने त्यांच्या वेबसाइटवर तपशील जारी केला आहे (Indian Air Force Releases details on Agnipath recruitment scheme). या तपशिलानुसार, चार वर्षांच्या सेवेदरम्यान अग्निवीरांना हवाई दलाकडून अनेक सुविधा पुरविल्या जातील, ज्या कायमस्वरूपी हवाई दलाच्या कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सुविधांनुसार असतील. वायुसेनेच्या वेबसाइटवर अपलोड केलेल्या माहितीनुसार, पगारासह अग्निवीरांना हार्डशिप भत्ता, गणवेश भत्ता, कॅन्टीन सुविधा आणि वैद्यकीय सुविधा देखील मिळतील. या सुविधा नियमित सैनिकाला मिळतात. Agnipath Scheme : केंद्र आणि राज्य सरकार देणार अग्निवीरांना खास सवलत, 4 वर्षानंतर होणार अनेक फायदे अग्निवीरांना सेवा कालावधीत प्रवास भत्ताही मिळेल. याशिवाय त्यांना वर्षातून ३० दिवसांची रजा मिळणार आहे. त्यांच्यासाठी वैद्यकीय रजेची व्यवस्था वेगळी आहे. अग्निवीरांना सीएसडी कॅन्टीनची सुविधाही मिळणार आहे. सेवेदरम्यान (चार वर्षे) दुर्दैवाने अग्निवीरचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला विमा संरक्षण मिळेल. याअंतर्गत त्यांच्या कुटुंबाला सुमारे एक कोटी रुपये मिळणार आहेत.
The Indian Air Force releases details on 'Agnipath' recruitment scheme
— ANI (@ANI) June 19, 2022
1/2 pic.twitter.com/YKFtJZ2OzP
वायुसेना कायदा 1950 अंतर्गत त्यांची हवाई दलात भरती 4 वर्षांसाठी असेल असं हवाई दलानं म्हटलं आहे. हवाई दलात अग्निवीरांची वेगळी रँक असेल, जी सध्याच्या रँकपेक्षा वेगळी असेल. अग्निपथ योजनेच्या सर्व अटींचं अग्निवीरांना पालन करावं लागेल. वायुसेनेत नियुक्तीच्या वेळी 18 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या अग्निवीरांना त्यांच्या पालकांची स्वाक्षरी असलेले नियुक्ती पत्र घ्यावे लागेल. चार वर्षांच्या सेवेनंतर 25 टक्के अग्निवीरांना नियमित केडरमध्ये घेतलं जाईल. या २५ टक्के अग्निवीरांची नियुक्ती त्यांच्या सेवा कालावधीतील कामगिरीच्या आधारे केली जाईल. केंद्र सरकारच्या ‘अग्निपथ’ स्कीमला का होतोय देशभरात विरोध? काय आहे तरुणांचं म्हणणं? इथे मिळेल प्रत्येक प्रश्नाचं उत्तर वायुसेनेनुसार अग्निवीर हा सन्मान आणि पुरस्काराचा हक्कदार असेल. वायुसेनेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार अग्निवीरांना सन्मान आणि पुरस्कार दिले जातील. हवाई दलात भरती झाल्यानंतर अग्निवीरांना लष्कराच्या गरजेनुसार प्रशिक्षण दिले जाणार आहे.