अफगाणिस्तान, 21 ऑगस्ट: तालिबाननं (Taliban) अफगाणिस्तान (Afghanistan) मध्ये शिरकाव केल्यानंतर परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. अशातच देशावर आपली पकड मजबूत करण्यासाठी तालिबान प्रयत्न करत आहे. धक्कादायक म्हणजे हे प्रयत्न हिटलरसारखे करत असल्याचं समोर आलंय. दहशतवादी संघटनेनं मागील सरकारच्या काळातील सुरक्षा यंत्रणेशी निगडीत लोकांची ओळख पटवून त्यांना ठार करण्यास सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे, पाश्चिमात्य देशांकडून आपल्या सत्तेला मान्यता मिळवण्यासाठी तसंच आपली प्रतिमा सुधारण्यासाठी संक्रमणकालीन (Transitional) सरकार बनवण्याचे काम सुरू केले आहे. तालिबानचं अधूरं स्वप्न, ‘या’ भागात आजवर मिळू शकला नाही कब्जा समोर आलेल्या वृत्तानुसार, ज्यांनी ज्यांनी यापूर्वी NDS आणि अमेरिकेसाठी काम केलं आहे अशा लोकांच्या घरोघरी जाऊन तालिबान ओळख पटवत आहे. काबूलमधून येणारे अहवाल अत्यंत भीषण आहेत. यामध्ये असे म्हटले आहे की, तालिबान हिटलरची कुख्यात गुप्तचर संस्था गेस्टापो सारखं काम करत आहे. यात राष्ट्रीय सुरक्षा संचालनालय (एनडीएस), सैन्यासोबत काम करणारे दुभाषी म्हणून अमेरिका आणि संबंधित सैन्याची मदत करणारे सर्व अफगाणांना चिन्हांकित करुन त्यांना नष्ट करण्यास सुरुवात केली आहे. तालिबान गेल्या सरकारमधील संबंधित लोकांना लक्ष्य करत असताना, दुसरीकडे जोरदार सशस्त्र नैतिकाच्या बळावर मुलांना किंना स्त्रियांनाही सोडत नाही आहेत. राजधानीत ब्युटी पार्लर बंद करण्यात आले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







