जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / अफगाणिस्तानच्या पंजशीर खोऱ्या आजपर्यंत पोहोचू शकला नाही तालिबान, पुल-ए-हेसार भागातही सुटलं नियंत्रण

अफगाणिस्तानच्या पंजशीर खोऱ्या आजपर्यंत पोहोचू शकला नाही तालिबान, पुल-ए-हेसार भागातही सुटलं नियंत्रण

अफगाणिस्तानच्या पंजशीर खोऱ्या आजपर्यंत पोहोचू शकला नाही तालिबान, पुल-ए-हेसार भागातही सुटलं नियंत्रण

Taliban Fighters injured: अफगाणिस्तानमधील (Afghanistan) एका प्रातांवर तालिबानीना कब्जा मिळवता आला नाही आहे. तालिबानांना ठार करत प्रातांतून मागे हटण्यास भाग पाडलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

अफगाणिस्तान, 21 ऑगस्ट: तालिबानींनी (Taliban) काबूल (Kabul) मध्ये कब्जा केल्यानंतर अफगाणिस्तानमधील परिस्थिती गंभीर झाली. मात्र अफगाणिस्तानमधील (Afghanistan) एका प्रातांवर तालिबानीना कब्जा मिळवता आला नाही आहे. हेरात टाइम्सनं दिलेल्या वृत्तानुसार, अफगाणिस्तानमधील बगलान (baghlan) प्रांतातल्या पुल-ए-हेसार (Pol-e-Hisar ) भागात तालिबाननं आपलं नियंत्रण सुटलं आहे. तिथे लोकल मुजाहिद्दीन दहशतवाद्यांनी काही तालिबानांना ठार केले आहे. तालिबानांना ठार करत पुल-ए-हेसार पासून मागे हटण्यास भाग पाडलं आहे. आता या प्रांतात सर्वत्र अफगाणिस्तानचा झेंडा फडकत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, यावेळी जवळपास 60 तालिबानी मृत्यू आणि जखमी झालेत.

अफगणिस्तानच्या जनतेला संकटात सोडून पळाले राष्ट्राध्यक्ष; न्यूयॉर्कमध्ये आयुष्याचा आनंद घेतेय लेक

पंजशीर खोऱ्यात कब्जा करणं हे तालिबानचं अधूरं स्वप्न शुक्रवारी तालिबान पंजशीर खोऱ्यात कब्जा मिळवण्यासाठी पोहोचले. मात्र तिथे पोहोचल्यावर तालिबानी दहशतवाद्यांचाच खात्मा झाला. असं म्हणतात आजपर्यंत तालिबान या खोऱ्यात आपलं वर्चस्व गाजवू शकला नाही आहे. हा भाग नॉर्दन अलायंसचे माजी कमांडर अहमद शाह मसूद यांचा आहे. 90 व्या दशकात जेव्हा तालिबाननं अफगाणिस्तानावर कब्जा केला होता. तेव्हा पंजशीर खोऱ्यात त्यांची हुकूमशाही लादू शकला नाही. असं म्हणतात की, एकदा अहमद शाह मसूद तालिबानच्या हल्ल्यातून गंभीर जखमी झाले होते. तेव्हा भारतानंच ताजिकिस्तानच्या फरखोर एअरबेसवर त्यांच्यावर उपचार केले होते. फरखोरमध्ये भारताचा पहिला आंतरराष्ट्रीय सैन्य बेस आहे. भारत- अफगाणिस्तानचे चांगल्या संबंधांमुळे दिल्लीमध्ये एका रस्त्याला अहमद शाह मसूद नावं देण्यात आलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात