• Home
 • »
 • News
 • »
 • videsh
 • »
 • Afghanistan: प्रसिद्ध डॉक्टरची अपहरणानंतर तालिबानकडून हत्या, खंडणी देऊनही रस्त्यावर फेकला मृतदेह

Afghanistan: प्रसिद्ध डॉक्टरची अपहरणानंतर तालिबानकडून हत्या, खंडणी देऊनही रस्त्यावर फेकला मृतदेह

तालिबाननं (Taliban) अफगाणिस्तानवर (Afghanistan)ताबा मिळवल्यानंतर अजूनही परिस्थिती सुधारलेली दिसत नाही आहे.

 • Share this:
  काबूल, 21 नोव्हेंबर: तालिबाननं (Taliban) अफगाणिस्तानवर (Afghanistan)ताबा मिळवल्यानंतर अजूनही परिस्थिती सुधारलेली दिसत नाही आहे. उत्तर अफगाणिस्तानमध्ये एका प्रसिद्ध डॉक्टरचं (Doctor Killed in Afghanistan) अपहरण करून हत्या करण्यात आली आहे. मोहम्मद नादेर अलेमी नावाच्या या डॉक्टरचे दोन महिन्यांपूर्वी मजार-ए-शरीफ शहरातून अपहरण करण्यात आलं होतं. अपहरणकर्त्यांनी नंतर त्यांच्या सुटकेसाठी खंडणीची मागणी केली. मात्र पैसे देऊनही त्यांची हत्या करण्यात आली. डॉक्टरांचा मुलगा रोहीन आलेमी यानं शुक्रवारी याबाबतची माहिती दिली. डॉक्टरच्या मुलानं सांगितलं की, अपहरणकर्त्यांनी त्याच्या सुटकेसाठी मोठ्या रकमेची मागणी केली होती. अखेर कुटुंबाने 350,000 (डॉलर) देण्याचे मान्य केलं. दरम्यान सुरुवातीला खंडणीची मागणी दुप्पट होती. त्यांच्या मुलानं सांगितलं की, खंडणीचे पैसे मिळाले असतानाही अपहरणकर्त्यांनी अलेमीची हत्या केली आणि त्याचा मृतदेह रस्त्यावर टाकून दिला. हेही वाचा- टॉस हरल्यानंतर ड्यू प्लेसिसनं दिला ख्रिस गेलला धक्का, पाहा VIDEO सरकारी रुग्णालयात करायचे काम रोहेन अलेमी म्हणाले, माझ्या वडिलांचा खूप छळ करण्यात आला. त्यांच्या शरीरावर जखमा होत्या. व्यवसायाने मानसोपचारतज्ज्ञ असलेल्या अलेमीने मजार-ए-शरीफ येथील सरकारी प्रांतीय रुग्णालयात काम करायचे. त्यांच्याकडे खासगी दवाखाना देखील होता, जे शहरातील पहिले खासगी मनोरुग्णालय असल्याचं सांगितलं जात. यावर तालिबान काय म्हणाले? तालिबानच्या अंतर्गत मंत्रालयाचे प्रवक्ते सईद खोस्ती यांनी सांगितले की तालिबानी सैन्याने मजार-ए-शरीफजवळील बल्ख प्रांतात अलेमीसह तीन लोकांच्या अपहरणामागे आठ संशयित अपहरणकर्त्यांना अटक केली आहे. ते म्हणाले की, अपहरण केलेल्यांपैकी दोघांची सुटका करण्यात आली होती. मात्र अलेमीची आधीच हत्या करण्यात आली होती. अटक करण्यात आलेल्या आठ जणांपैकी दोन साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत. ज्यांनी डॉक्टरची हत्या केली असावी. हेही वाचा- मंत्रिमंडळाचा आज विस्तार! 11 कॅबिनेट आणि 4 नवे राज्यमंत्री घेणार शपथ सरकारची घोषणा दरम्यान, तालिबान संचालित अर्थ मंत्रालयाने घोषित केले की, सर्व सरकारी कर्मचार्‍यांना तीन महिन्यांचे वेतन दिले जाईल, जे तालिबानने ताब्यात घेतल्यापासून दिलेले नव्हते. अफगाणिस्तानात ढासळत चाललेल्या अर्थव्यवस्थेमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना वेतनाचा अभाव हे गरीबी वाढवण्याचे एक कारण आहे.
  Published by:Pooja Vichare
  First published: