जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / बॉम्बस्फोटने काबूल हादरले; शाळा, ट्रेनिंग सेंटरमध्ये पाठोपाठ स्फोट, 6 मुलांचा मृत्यू

बॉम्बस्फोटने काबूल हादरले; शाळा, ट्रेनिंग सेंटरमध्ये पाठोपाठ स्फोट, 6 मुलांचा मृत्यू

kabul blast

kabul blast

Kabul Blast: अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील (Kabul) माध्यमिक शाळेत आत्मघातकी तीन बॉम्बस्फोट झाले आहेत. या घटनेत 6 हून अधिक विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

काबूल, 19 एप्रिल: अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील (Kabul) माध्यमिक शाळेत आत्मघातकी तीन बॉम्बस्फोट झाले आहेत. या घटनेत 6 हून अधिक विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर जखमी झाल्याची माहिती आहे. ज्या शाळेमध्ये बॉम्बस्फोट झाले आहेत ती हजारा समुदाय मोठ्या संख्येने असलेल्या ठिकाणी आहे. शहरातील अब्दुल रहीम शहीद हायस्कूलजवळ झालेल्या स्फोटांची माहिती केंद्रीय गृह मंत्रालयाने दिली असून या घटनेची चौकशी सुरू झाली आहे. अफगाणिस्तान येथील परिस्थिती काही अंशी शांततेची होत असताना आता पुन्हा एकदा या घटनेनं काबूल शहर हादरलं आहे. शिया समुदायाला लक्ष करत आत्मघातकी हल्लेखोरांकडून हे स्फोट करण्यात आले असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. काबूल आणि अफगाणिस्तान येथील परिस्थिती काही निवळत असताना आता पुन्हा एकदा शिया समुदायावर हल्ला करण्यासाठी हे पाऊल उचललं असल्याची माहिती काबूल पोलिसांनी दिली आहे. या स्फोट एका प्रशिक्षण केंद्राजवळ आणि शाळेजवळ हे स्फोट झाले आहेत. या शाळेतील मुलं घरी परतत असताना चार ते पाच आत्मघातकी हल्ले करण्यात आले आहेत. एकूणच या घटनेचा तपास काबूल पोलिस करत असल्याची माहिती मिळत आहे. तालिबाननं अफगाणिस्तानची सत्ता मिळवल्यानंतर देशाला सुरक्षित केलं असल्याचा दावा केला होता. मात्र, आंतरराष्ट्रीय अधिकारी आणि विश्लेषकांनी इस्लामिक स्टेटसकडून हल्ले वाढल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.तालिबान सत्तेत आल्यानंतर अफगाणिस्तानमध्ये इस्लामिक स्टेट सक्रीय झालं आहे. दहशतवादी संघटना शिया समुदायाला निशाणा बनवत आहे. शिया मुस्लीम समुदायाच्या मशिदीवर हल्ले केले जात आहेत. अफगाणिस्तानात बॉम्बस्फोट कधी झाले? 8 मे 2021 रोजी काबूलमध्ये मोठा बॉम्बस्फोट झाला होता. हा स्फोट एका शाळेजवळ करण्यात आला. या घटनेत 50 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. 100 हून अधिक जखमी झाले. 14 नोव्हेंबर 2021 रोजी काबुलमधील शियाबहुल भागात स्फोट झाला. यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला, तर 7 जण जखमी झाले. 15 नोव्हेंबर 2021 रोजी कंदहार प्रांतातील मशिदीत स्फोट झाला. यामध्ये 32 जणांचा मृत्यू झाला, तर 40 जण जखमी झाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात