Home /News /videsh /

काबूल विमानतळावरील लोकं भुकेले आणि तहानलेले; पाण्याची बॉटल 3 हजार तर राईस प्लेस 7500

काबूल विमानतळावरील लोकं भुकेले आणि तहानलेले; पाण्याची बॉटल 3 हजार तर राईस प्लेस 7500

अफगाणिस्तानमधून (Afghanistan Crisis) निघण्याचा केवळ एकच रस्ता शिल्लक आहे तो म्हणजे काबूल विमानतळ.

    काबूल, 26 ऑगस्ट: अफगाणिस्तानातील(Afghanistan) परिस्थिती गंभीर आहे. तालिबाननं (Taliban) अफगाणिस्तानचा कब्जा घेतल्यानंतर देशातील परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. अनेक लोकं केवळ कसा तरी देश सोडायचा प्रयत्न करत आहेत. अफगाणिस्तानमधून (Afghanistan Crisis) निघण्याचा केवळ एकच रस्ता शिल्लक आहे तो म्हणजे काबूल विमानतळ. (Kabul Airport) या विमानतळावरील सुरक्षा अमेरिका सैन्याकडे आहे. सद्यस्थितीत काबूल विमानतळावर सुमारे अडीच लाख लोकांची गर्दी आहे. जे अफगाणिस्तान सोडून जाऊ इच्छित आहेत. दरम्यान विमानतळावरील लोकं भुकेले आणि तहानलेले आहेत. यात अनेकांनी विमानतळावरच जीव सोडला आहे. अन् फोटोतील तिघांनी सोडलं जग, एकटीच महिला उरली; साताऱ्यातील खळबळजनक घटना  दरम्यान विमानतळावरील अन्न आणि पिण्याच्या पाण्याचे भाव गगनाला भिडत असल्याची मोठी बातमी समोर आली आहे. विमानतळावर एका पिण्याच्या पाण्याची बॉटल 40 डॉलर म्हणजे 3000 रुपयांना मिळत आहे. तर राईस प्लेटसाठी 100 डॉलर म्हणजेच 7500 रुपये खर्च करावे लागत आहेत. आधी नवऱ्यानं मग आईनंही घेतला जगाचा निरोप; हताश महिलेनं लेकीसह असा केला आयुष्याचा शेवट  तसंच विमानतळावर पाणी किंवा खाणं खरेदी करायचं असेल तर येथे अफगाणिस्तानची करन्सी घेतली जात नाही आहे. केवळ डॉलरमध्ये पेमेंट स्विकारलं जात आहे. घरातून विमानतळावर पोहोचायला लागले 5 ते 6 दिवस अफगाणिस्तानाहून आलेले लोकं सांगतात की, काबूलमध्ये घरातून विमानतळावर पोहोचण्यासाठी 5 ते 6 दिवस लागले. कारण शहरापासून विमानतळापर्यंत तालिबानी आहेत. तालिबानच्या गोळीबारामुळे दहशत निर्माण झाली आहे आणि हजारोंचा जमाव ओलांडून विमानतळावर प्रवेश करणं एक कठीण काम आहे. दरम्यान तुम्ही विमानतळाच्या आत गेलात तरी विमान मिळेपर्यंत 5 ते 6 दिवस लागतात. लोकांना फक्त बिस्किट नमकीनवर दिवस काढावे लागत आहेत. खाण्यापिण्याच्या किंमती वाढल्यानं नागरिकांच्या समस्या आणखीन वाढल्या आहेत.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Afghanistan, Kabul

    पुढील बातम्या