काबुल, 16 ऑगस्ट: अफगाणिस्तान आता तालिबान्यांच्या ताब्यात जायला फारसा अवधी राहिलेला नाही. औपचारिकता फक्त बाकी आहे. त्याआधीच आता नागरिकांची देश सोडण्याची धडपड सुरू झालेली दिसते. काबुल विमानतळावर एसटी स्टँडसारखी गर्दी झाली आहे आणि विमानात चढण्यासाठी, जागा मिळवण्यासाठी धक्काबुक्की सुरू झाल्याचं चित्र आहे. त्यातच विमानतळावर झालेल्या गोळीबारात किमान 5 जण ठार झाले.
Indian Government has prepared 2 aircrafts on hold for emergency evacuation while the flights due at 8:30 pm have been preponed to 12:30 from Kabul to Delhi due to reports firing near airports and streets as Taliban gains control. Some big political names that have landed in pic.twitter.com/0B15kYIRKZ
— Dogra Hun (@DograHun) August 16, 2021
काबूलवर ताबा मिळवल्याने विमानांची उड्डाणेही रद्द झाली. त्यामुळे विमानतळावर हजारो लोकांची गर्दी झाली आहे. तालिबानने अफगाणिस्तानच्या सर्व सीमांवर ताबा मिळवला आहे.
काबूल एअरपोर्टवर मुंबई लोकलसारखी परिस्थिती;विमानात चढण्यासाठी नागरिकांची झुंबड
त्यामुळे देशाबाहेर पडण्यासाठी हवाईमार्ग हा एकमेव पर्याय उपलब्ध आहे. नागरिकांनी सैरावैरा पळत विमान पकडण्याची घाई सुरू केली, काही लोक जागा मिळवण्यासाठी अक्षरशः लटकत होते. त्यांना पांगवण्यासाठी अमेरिकन सैन्याने हवेत गोळीबार केल्याचं अमेरिकन अधिकाऱ्याने सांगितलं. पण गोळीबारात कोणी ठार झाल्याचा त्यांनी इन्कार केला.
Airport #Kabul right now. #Taliban are trying to enter… people fleeing …#Afghanishtan #अफगानिस्तान #तालिबान#AfghanistanBurning #AfghanWomen #KabulHasFallen #kabulairport #JoeBiden pic.twitter.com/bX3X7kujLi
— Pooja Sharma (@PoojaSh28927493) August 16, 2021
दरम्यान काही प्रत्यक्षदर्शींनी पाच जणांचे मृतदेह बाहेर काढत असल्याचं सांगितल्याचं वृत्त काही माध्यमांनी दिलं आहे. अफगाणिस्तानच्या राजधानीत परिस्थिती आता हाताबाहेर जायला लागली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Afghanistan, Taliban