जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / वऱ्हाड्यांची बस कोसळली दरीत, लग्नादिवशीच निघाल्या अंत्ययात्रा, 25 जणांचा मृत्यू

वऱ्हाड्यांची बस कोसळली दरीत, लग्नादिवशीच निघाल्या अंत्ययात्रा, 25 जणांचा मृत्यू

 अपघात

अपघात

अफगाणिस्तानमध्ये अशा अपघातांची संख्या जास्त आहे. रस्ते खराब असल्यानं आणि महामार्गांवर बेजबाबदारपणे वाहने चालवल्याने असे अपघात सातत्याने होत असतात.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

अफगाणिस्तान : लग्नाहून परत येत असताना वऱ्हाड्यांचा बसचा अपघात झाला. लग्नाच्या आनंदावर विरजण पडलं आहे. लग्नादिवशीच 25 जणांची अंत्ययात्रा निघाली आहे. वऱ्हाड्यांची बस दरीत कोसळली आणि होत्याचं नव्हतं झालं. ही धक्कादायक घटना अफगाणिस्तानात एका भीषण अपघातात २५ जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय. रस्ते अपघातात मिनी बस दरीत कोसळून ही घनटना घडली. यामध्ये ९ मुले आणि १२ महिलांचा समावेश आहे. सर ए पुल प्रांतातील एका पर्वतीय प्रदेशात हा अपघात झाला. लग्न सोहळा आटोपून सर्वजण घरी परत येत होते. त्यावेळी सय्यद जिल्ह्यातून जात असताना गाडी दरीत कोसळली. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिनी बसच्या अपघातात चालकाची चूक असल्याचं समोर आलंय. चालकाच्या बेजबाबदारपणामुळे कार खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेत कोणी जिवंत वाचलं का याबाबत माहिती मिळालेली नाही.

MP Road Accident : दुर्दैवी! आधी बाईकला ठोकलं मग बोलेरोवर कोसळला ट्रक, 7 जणांचा जागीच मृत्यू

अफगाणिस्तानमध्ये अशा अपघातांची संख्या जास्त आहे. रस्ते खराब असल्यानं आणि महामार्गांवर बेजबाबदारपणे वाहने चालवल्याने असे अपघात सातत्याने होत असतात. यामध्ये मृत्यू होणाऱ्यांचा आकडाही जास्त असतो.

Nashik News : धक्कादायक! मुंबई नाशिक महामार्गावर अपघात, कंटेनरने 2 साध्वींना चिरडलं

तालिबानचे शासन असणाऱ्या अफगाणिस्तानमध्ये सुरक्षा व्यवस्थाही म्हणावी तशी चांगली नाही. तालिबानचा डेप्युटी गव्हर्नर मौलवी निसार अहमद अहमदीचा बॉम्ब हल्ल्यात मृत्यू झाला होता. फैजाबादच्या महकमा प्लाझा इथं डेप्युटी गव्हर्नरच्या ताफ्यात स्फोटकांनी भरलेलं वाहन घुसवण्यात आलं. या घटनेत आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: accident
  • First Published :
जाहिरात
जाहिरात