सीधी : बल्कर अनियंत्रीत होऊन भीषण अपघात झाला आहे. दुर्दैवी घटनेत जागीच सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. आधी ट्रकने (बल्कर) दुचाकीला ठोकलं आणि नंतर कारवर उलटला आहे. त्यामुळे भीषण अपघात झाला. ट्रकचं नियंत्रण सुटल्याने ही घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. 5 जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जणांना रुग्णालयता घेऊन गेल्यावर मृत घोषित करण्यात आलं. या अपघातात दोन जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील सिधी जिल्ह्यात घडली आहे. पोलीस अधीक्षक डॉ. रवींद्र सिंह यांनी पीटीआयला सांगितले की, हा अपघात सिधी-टिकरी मार्गावरील डोल गावाजवळ सकाळी 9.30 ते 10 च्या दरम्यान झाला.
Crime News: महाराष्ट्राला हादरवणारी घटना; प्रेयसीचे तुकडे करत कुकरमध्ये शिजवले, मग मिक्सरमध्ये बारीक करून..ते म्हणाले की डंपर-ट्रकने प्रथम एसयूव्हीला धडक दिली आणि नंतर ती उलटली आणि त्यात सात जण ठार झाले. त्यांनी सांगितले की, माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. या प्रकरणाची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, अनियंत्रित ट्रक अचानक खड्ड्यात अडकला. त्यामुळे बोलेरो गाडीवरच पडली.
दारावर आले खोटे अधिकारी; उकळले लाखो रुपयेघटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाचे बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आणि गाडीत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आले. जामोडी पोलिस स्टेशनचे प्रभारी शेषमणी मिश्रा यांनी सांगितले की, सिधी-टिकरी मार्गावरील डोल गावाजवळ हा अपघात झाला. तो म्हणाला, बलकर ट्रकने प्रथम वाहनाला धडक दिली आणि नंतर तो उलटला. त्यामुळे 7 जणांचा मृत्यू झाला. त्यांनी सांगितले की, माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले.