काबूल, 20 ऑगस्ट: तालिबाननं (Taliban) अफगाणिस्तानवर (Afghanistan) कब्जा केल्यानंतर तेथील परिस्थिती गंभीर आहे. नागरिक देश सोडून जाताना दिसत आहेत. मात्र तिथलं चित्र काहीसं बदलेलं दिसत आहे. सुरुवातीला लोकं खूप घाबरले होते. आता हेच लोक रस्त्यावर उतरुन तालिबानचा निषेध (Prohibition) करताना दिसाहेत. लोकं तालिबानच्या विरोधात निदर्शने (Protest) करताना दिसत आहेत. राजधानी काबूलसह अफगाणिस्तानातील अनेक शहरांमध्ये लोकं निदर्शने करत आहेत. तसंच या लोकांना समजावण्यासाठी तालिबान देशातील इमामांचीही मदत घेतानाही दिसत आहेत.
शुक्रवारच्या नमाजच्या वेळी सर्व लोकांना एकत्रित रहायला सांगण्यात यावे, असे त्यांना सांगण्यात आले आहे. गुरुवारी तालिबानी दहशतवाद्यांनी कुनार प्रांतातील असदाबाद येथे आंदोलनकर्त्यांवर गोळीबार केल्याचं वृत्त रॉयटर्सनं दिलं आहे. या गोळीबारात काही लोकांचा मृत्यू झाल्याचं तेथे उपस्थित असलेले लोकं सांगत असल्याचंही रॉयटर्सचं वृत्त आहे. दरम्यान लोकांचा जीव गोळीबारात गेला, की चेंगराचेंगरीमुळे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसंच काबूलमध्येही गोळीबार झाल्याचं वृत्त आहे. तेथे तालिबानी दहशतवाद्यांनी हवेत गोळीबार केल्याचं समजतंय.
नारायण राणेंच्या अडचणीत वाढ, जन आशीर्वाद यात्रेचे आयोजक गोत्यात
स्वातंत्र्यदिनीच अफगाणिस्तानातील नागरिकांकडून तालिबानचा विरोध
अफगाणिस्तान 19 ऑगस्ट 1919 रोजीच ब्रिटिश राजवटीपासून स्वतंत्र झाला होते. मात्र यावर्षी स्वातंत्र्यदिन साजरा होण्यापूर्वीच तेथे तालिबानने कब्जा केला. स्वातंत्र्य दिनानिमित्त अफगाणिस्तानातील आंदोलक रस्त्यावर उतरले. लोक काबुलमध्ये हमारा झंडा, हमारी पहचान अशी घोषणा देताना दिसले.
आंदोलकांच्या हातात अफगाणिस्तानचा झेंडा होता. यावेळी निदर्शनावेळी पुरुष आणि महिलांनी हाताला काळी पट्टी बांधलेली होती. आंदोलकांनी काही ठिकाणी तालिबानचा पांढरा झेंडाही फाडला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Afghanistan, Kabul, Taliban