मुंबई, 20 ऑगस्ट: केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांची जन आशीर्वाद यात्रा (Jan Ashirwad Yatra) कालपासून सुरू झाली आहे. मात्र या जन आशीर्वाद यात्रेच्या आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोविडच्या (Covid 19) पार्श्वभूमीवर गर्दी जमवायला परवानगी नसताना देखील भाजपनं (BJP) जन आशीर्वाद यात्रा काढली. या पार्श्वभूमीवर मुंबईत (Mumbai) 7 ठिकाणी आयोजकांवर गुन्हे दाखल झालेत.
Mumbai: Seven separate FIRs registered at Vile Parle, Kherwadi, Mahim, Shivaji Park, Dadar, Chembur, Govandi police stations against BJP's Jan Ashirwad Yatra for violation of #COVID19 protocols.
— ANI (@ANI) August 19, 2021
काल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेला मुंबईतून सुरुवात झाली. विलेपार्ले, खेरवाडी, माहीम, शिवाजी पार्क, दादर, चेंबूर, गोवंडी पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आलेत. जन आशीर्वाद यात्रेची परवानगी नसतानाही ती काढल्यानं पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आज दीड महिन्यांनी जन आशीर्वाद यात्रेनिमित्त मुंबईत आलो. यात्रेदरम्यान मुंबईत ठिकठिकाणी कार्यकर्त्यांनी, सामान्यांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले. माझ्यावर आणि भारतीय जनता पक्षावर दाखवलेल्या या विश्वासाबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. @PMOIndia pic.twitter.com/CG2E4ogqgi
— Narayan Rane (@MeNarayanRane) August 19, 2021
कपिल पाटील यांच्याही जन आशीर्वाद यात्रेवर कारवाई
मंगळवारी संध्याकाळी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या स्वागतासाठी भाजपच्या नवी मुंबईतील पदाधिकाऱ्यांनी महापालिका मुख्यालयापासून जनआशीर्वाद यात्रा काढली होती. या यात्रेत कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याने एनआरआय पोलिसांनी आयोजकांसह 70 ते 80 भाजपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केल्याचं समजतंय.
हेही वाचा- '...म्हणून पुढच्या वेळेस चड्डीत राहायचं'; शुद्धीकरणाच्या मुद्द्यावरुन राणे सुपूत्र आक्रमक
शिवाजी पार्कातून नारायण राणेंचा शिवसेनेवर हल्लाबोल
केवळ बोलल्याने बेकारी (unemployment) जात नाही, त्यासाठी काम करावे लागते, असं म्हणत केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union minister Narayan Rane) यांनी शिवसेनेवर (Shivsena) टीका केली आहे. मी 16-16 तास काम करतो, असं सांगतानाच राणेंनी उमेदीच्या काळातील राजकीय घटनांच्या आठवणी सांगितल्या.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासमोर जाऊन मी आज नतमस्तक झालो. मी एवढंच सांगितलं की साहेब, आज तुम्ही मला आशीर्वाद द्यायला हवे होते. मला बाळासाहेबांनीच घडवलेलं आहे. #JanAshirwadYatra pic.twitter.com/RFgZlNwJc1
— Narayan Rane (@MeNarayanRane) August 19, 2021
मी दीड महिन्यांनंतर दिल्लीतून मुंबई आलो आहे, असं सांगताना जनआशीर्वाद यात्रेला औपचारिक सुरुवात झाल्याचं त्यांनी जाहीर केलं. मी तीन वेळा मुंबईतून नगरसेवक झालो. बराच पल्ला गाठला. मला जवळपास 10 पदं मिळाली. इतरांना 1 पदही मिळत नाही, असा टोमणा त्यांनी लगावला. आपण आपल्या खात्याच्या माध्यमातून चांगलं काम करणार असल्याचं सांगत उद्योजकता निर्माण करणार असल्याचं नारायण राणे म्हणाले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mumbai, Narayan rane