Home /News /videsh /

Adolf Hitler Death Anniversary : हिटलरच्या मृत्यूची खात्री कशी पटवण्यात आली?

Adolf Hitler Death Anniversary : हिटलरच्या मृत्यूची खात्री कशी पटवण्यात आली?

दुसऱ्या महायुद्धात (World War II) जर्मनीचा पराभव ही एक मोठी घटना होती. अॅडॉल्फ हिटलरने (Adolf Hitler) 30 एप्रिल 1945 रोजी आत्महत्या केली, परंतु त्याच्या मृत्यूच्या अनेक कथाही समोर आल्या. डॉक्टरांनीही त्यांच्या मृत्यूला दुजोरा दिला होता. तरीही हिटलरचा मृत्यू (Death of Hitler) कसा झाला यावर अनेक प्रकारची मते मांडली गेली आणि हिटलरचा मृत्यू झाला की नाही याच्याही कथा प्रसिद्ध झाल्या.

पुढे वाचा ...
  नवी दिल्ली, 30 एप्रिल : जगात जेव्हा जेव्हा युद्धाची चर्चा होते, तेव्हा हुकूमशाही आणि हिटलरचा (Adolf Hitler) उल्लेख होतोच. गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धाने (Russia Ukraine War) दुसऱ्या महायुद्धाचीही आठवण करून दिली आहे. यावेळीही संकट युरोपवर आहे आणि रशिया-अमेरिकेसारख्या महासत्तांचा सामना होण्याचा धोका आहे, पण मैदान युरोपच आहे. दुसऱ्या महायुद्धाचा हुकूमशहा अॅडॉल्फ हिटलरने 30 एप्रिल रोजी आत्महत्या केली. दुसऱ्या महायुद्धात जर्मनीच्या पराभवामुळे निराश होऊन हिटलरने 1945 मध्ये हे पाऊल उचललं, पण हिटलरचा मृत्यू (Death of Hitler) कसा झाला यावरूनही अनेक वाद निर्माण झाले आहेत. तरीही हिटलरच्या मृत्यूची अधिकृतरीत्या खात्री कशी पटवण्यात आली याचीही एक कथा आहे. त्यावेळी कशी होती परिस्थिती? एप्रिल 1945 चा शेवटचा आठवडा जर्मनीच्या पराभवाची औपचारिकता पूर्ण करण्याचा आठवडा होता. दोन्ही बाजूंनी मित्र राष्ट्रे, पश्चिमेकडून अमेरिका आणि ब्रिटन आणि पूर्वेकडून सोव्हिएत युनियनचं सैन्य बर्लिनमध्ये घुसलं होतं. हिटलरच्याच कमांडरनी आणि जनरल्सनी त्याच्या आदेशाचं पालन करणं बंद केलं होतं किंवा त्यांनी समर्पण केलं होतं. 29 एप्रिलला सकाळी हिटलरने त्याची प्रेयसी इव्हा ब्राऊन हिच्याशी लग्न केलं. हिटलरने आत्महत्या केव्हा केली? बहुतेक इतिहासकारांच्या मते, मित्र राष्ट्रांचं सैन्य 30 एप्रिलला कधीही हिटलरपर्यंत पोहोचू शकत होतं. दुपारी तीन वाजता, हिटलरच्या बंकरमधील त्याच्या खोलीच्या बाहेर, त्याच्या विश्वासूंना गोळ्या झाडल्याचा आवाज ऐकू आला. ते आत गेले, तेव्हा त्यांना आढळलं की, हिटलरच्या डोक्यात गोळी लागली होती आणि इव्हा ब्राऊनचा सायनाइड सेवन केल्याने मृत्यू झाला होता. हिटलरच्या (Adolf Hitler) मृत्यूचे प्रत्यक्षदर्शी सापडले नाहीत आणि त्याचा मृतदेहही जाळण्यात आला. (प्रतिकात्मक फोटो: shutterstock)
  हिटलरच्या (Adolf Hitler) मृत्यूचे प्रत्यक्षदर्शी सापडले नाहीत आणि त्याचा मृतदेहही जाळण्यात आला. (प्रतिकात्मक फोटो: shutterstock)
  दुसऱ्या दिवशी घोषणेवर पुष्टी दुसऱ्या दिवशी जगभरात जर्मन रेडिओवरून हिटलरचा मृत्यू झाल्याची बातमी आली. यानंतर हिटलरच्या मृत्यूचे अनेक सिद्धांत मांडले गेले. पण असं म्हटलं जातं की, फ्रेंच शास्त्रज्ञांनी या सर्व अनुमानांना पूर्णविराम दिला आणि हिटलरचा मृत्यू 1945 मध्ये झाल्याचे निर्णायक पुरावे दिले. या प्रकरणाचे प्रत्यक्षदर्शी सापडले नाहीत. परंतु, बहुतेक जर्मन लोकांचा असा विश्वास होता की, हेच घडलं आहे. दंतांवरून ओळख पटवली युरोपियन जर्नल ऑफ इंटर्नल मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासात नाझी हुकूमशहा हिटलरने आधी सायनाइड गोळी घेतली आणि नंतर स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून घेतल्याचे पुरावे असल्याचा दावा केला आहे. या अभ्यासात हिटलरच्या दातांवरून त्याच्या मृत्यूची पुष्टी करण्यात आली. हे दात 2000 साली मॉस्कोमध्ये एका प्रदर्शनात ठेवण्यात आले होते. हिटलरने (Adolf Hitler) त्याच्या प्रेयसीसोबत आत्महत्या केली. (प्रतिकात्मक फोटो: shutterstock)
  हिटलरने (Adolf Hitler) त्याच्या प्रेयसीसोबत आत्महत्या केली. (प्रतिकात्मक फोटो: shutterstock)
  कथेची रशियन आवृत्ती पण हिटलरच्या मृत्यूनंतर त्याच्या मृतदेहाचं काय झालं, याबद्दलही वाद होता. यावर वेगवेगळी मतं आहेत. हिटलरच्या आधीच्या लेखी आदेशानुसार, त्याचा मृतदेह बंकरमधून बाहेर काढून बागेत आणून पेट्रोलमध्ये बुडवून आग लावण्यास सांगण्यात आलं होतं. त्याच वेळी, या प्रकरणात रशियन सैनिकांची कथा देखील आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, रशियन सैनिकांनी बरीच शोधाशोध केल्यानंतर हिटलरच्या मृतदेहाचे अवशेष सापडले. रशियन प्रपोगंडा काय आहे? रशियन सैनिकांना गोळ्यांच्या खुणा असलेली एक कवटी सापडल्याचं सांगण्यात आलं. ती हिटलरची कवटी असल्याचा दावा करण्यात आला आणि हिटलरचे अवशेष 1970 मध्ये पूर्णपणे जाळले गेले. दुसरीकडे, अनेक पाश्चात्य देशांचे तपास आणि इतिहासकार रशियन दाव्यांशी सहमत असल्याचे दिसत नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार, हिटलरच्या बंकरजवळील बागेत सापडलेल्या दातांवरून हिटलरच्या मृत्यूची पुष्टी झाली. त्याने सायनाइड खाल्ल्याचा पुष्टी केली. पाश्चिमात्य देशांनी रशियन दावे हा केवळ प्रपोगंडा असल्याचं म्हटलं. पण हिटलरबद्दल इतरही अनेक कथा रचल्या गेल्या की, तो अर्जेंटिनाला पळून गेला. काहींनी तो अंटार्क्टिकाला गेल्याचंही सांगितलं. नंतर तो चंद्रावर गेल्याचंही सांगण्यात आलं. परंतु सामान्यतः असं मानलं जातं की, हिटलरचा मृतदेह त्याच्या बंकरजवळ घाईघाईने जाळण्यात आला होता. याचे अवशेष नंतर रशियन अधिकार्‍यांना सापडलं. त्यात त्याच्या दातांचा समावेश होता. ते मॉस्कोला नेण्यात आले.
  Published by:Digital Desk
  First published:

  Tags: Germany

  पुढील बातम्या