वॉशिंग्टन, 30 नोव्हेंबर : अमेरिकेचे नवनिर्वाचित (US President) अध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांच्यासोबत अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये त्यांच्या उजव्या पायामध्ये क्रॅक पडल्याचे सांगितले जात आहे. आपल्या कुत्र्याशी खेळत असताना त्यांच्यासोबत हा अपघात झाला. सांगितले जात आहे की, पुढील काही आठवडे तरी त्यांना आधार मिळाल्याशिवाय चालता येणार नाही.
घटनेच्या वेळी बायडेन आपला जर्मन शेफर्ड कुत्रा 'मेजर' बरोबर खेळत होते.
जो बायडेन यांच्याकडे असे दोन कुत्रे आहेत. दुसरीकडे या घटनेनंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बायडेन यांची प्रकृती लवकर ठीक व्हावी यासाठी सदिच्छा दिल्या आहेत. जो बायडेन यांचे डॉक्टर केव्हिन ओ कॉर्नर म्हणाले की, नवनिर्वाचित अध्यक्षांच्या पायाला दुखापत झाली आहे. सीटी स्कॅनवरून बायडेन यांच्या उजव्या पायाचं हाड क्रॅक झाल्याचे समोर आले आहे. ते म्हणाले की, बायडेन यांना पुढील काही आठवडे आधाराशिवाय चालता येऊ शकणार नाही.
हे ही वाचा-आधी वीज कापली, स्फोट केला आणि...64 जणांनी केली इराणच्या अणू शास्त्रज्ञांची हत्या
सांगितले जात आहे की, 78 वर्षीय बायडेन आपल्या कुत्र्याबरोबर खेळत असताना अचानक जमिनीवर कोसळले. तज्ज्ञांकडून मिळालेल्या माहितीनुसार एक तासभर त्यांच्यावर उपचार सुरू होते. बायडेन दवाखान्यातून परत जात असताना, ते व्हॅनमध्ये होते म्हणून त्यांना कोणी पाहू शकलं नाही. निवडणूक जिंकल्यानंतर 20 जानेवारी रोजी जो बायडेन आपल्या अध्यक्षपदाची शपथ घेतील. त्यांनी आपल्या मंत्र्यांची नियुक्ती जलद केली आहे. दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्पही हळू हळू हार मान्य करीत असल्याचे दिसत आहे.