इराणच्या अणूशास्त्रज्ञांच्या हत्येशी संबंधित नवीन माहिती समोर आली आहे. शुक्रवारी इराणचे अणूशास्त्रज्ञ मोहसीन फाखरीजादेह यांचा मृत्यू झाला. इराणने इस्रायलवर खुनाचा आरोप केला असून या घटनेनंतर बराच काळ इस्रायलकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्याच वेळी, 62 जणांनी एकत्रितपणे फखरीजादेह यांची हत्या केल्याची माहिती मिळाली आहे.
डेली मेलच्या वृत्तानुसार, इराणी पत्रकार मोहम्मद अहवाजे यांनी लीक झालेल्या कागदपत्रांच्या आधारावार दावा केला आहे की, इराणच्या संरक्षण मंत्रालयाच्य रिसर्च अॅण्ड इनोव्हेशन ऑर्गनायजेशनचे प्रमुख फखरीजादेह यांची हत्या करण्यासाठी तेहरानच्या महामार्गावरील एका चौकात 12 लोक आधीच पोहोचले होते. तर इतर 50 जण ठिकठिकाणी मारेकऱ्यांची मदत करीत होते.