मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

क्रूरतेची परिसीमा! प्रेग्नेंट राहिली हुकूमशाहाच्या सैन्यातील महिला, भूल दिल्याशिवायच केला गर्भपात

क्रूरतेची परिसीमा! प्रेग्नेंट राहिली हुकूमशाहाच्या सैन्यातील महिला, भूल दिल्याशिवायच केला गर्भपात

सध्या दुसऱ्या देशात वास्तव्य करत असलेल्या, मात्र आधी उत्तर कोरियातील सैन्यात असणाऱ्या एका महिलेनं स्वतःसोबत घडलेली एक थरकाप उडवणारी कहाणी जगासमोर आणली आहे.

सध्या दुसऱ्या देशात वास्तव्य करत असलेल्या, मात्र आधी उत्तर कोरियातील सैन्यात असणाऱ्या एका महिलेनं स्वतःसोबत घडलेली एक थरकाप उडवणारी कहाणी जगासमोर आणली आहे.

सध्या दुसऱ्या देशात वास्तव्य करत असलेल्या, मात्र आधी उत्तर कोरियातील सैन्यात असणाऱ्या एका महिलेनं स्वतःसोबत घडलेली एक थरकाप उडवणारी कहाणी जगासमोर आणली आहे.

उत्तर कोरियाचे (North Korea) हुकुमशहा (Dictator) क्रूरकर्मा किम जोंग उन यांच्या (Kim Jong Un) क्रूरतेच्या अनेक कहाण्या अधूनमधून जगासमोर येत असतात. जगभरात सर्व देशामध्ये लोकशाही नांदत असताना या देशात मात्र आजही हुकुमशाही चालते. गेली 11 वर्षे इथली सत्ता किम जोंग उन या क्रूर वृत्तीच्या व्यक्तीकडे आहे. या देशातील नियम अतिशय कडक असून, इथल्या कारभाराविषयी प्रचंड गुप्तता पाळली जाते. इथली कोणतीही गोष्ट बाहेरच्या जगापर्यंत पोहोचत नाही. तिथल्या हुकूमशहाला हवी असेल तेव्हा आणि हवी असेल तीच माहिती जगासमोर येते. इथल्या माध्यमांपासून ते लोकांपर्यंत सर्वांवर या हुकूमशहाचे नियंत्रण आहे. चुकूनमाकून कोणी गौप्यस्फोट केलाच तर ती व्यक्ती जिवंत राहू शकत नाही.

याठिकाणी कायदे व्यवस्था, नियम अतिशय जाचक असून त्याचे उल्लंघन करणाऱ्यांना अत्यंत कठोर शिक्षा दिली जाते. यामध्ये लहान मुले, महिला, वृद्ध यांनादेखील दयामाया दाखवली जात नाही. मात्र काही वेळा इथून पळून जाण्यात यशस्वी ठरलेले आणि दुसऱ्या देशात आश्रय घेतलेले किंवा काही बंडखोर लोक इथल्या क्रूरतेच्या गुप्त कहाण्या उघड करतात. नुकतीच सध्या दुसऱ्या देशात वास्तव्य करत असलेल्या, मात्र आधी उत्तर कोरियातील सैन्यात असणाऱ्या एका महिलेनं स्वतःसोबत घडलेली एक थरकाप उडवणारी कहाणी जगासमोर आणली आहे.

हे वाचा-सोशल मीडियातील पोस्टनंतर पुतीन यांची मुलगी बेपत्ता, तर्क-वितर्कांना उधाण

या महिलेचे नाव जेनिफर किम (Jenifer Kim) असं आहे. ती 23 वर्षांची असताना तिला सैन्यात भरती होण्यास भाग पाडले गेले. यानंतर एका राजकीय सल्लागाराने (Political Advisor) तिच्यावर बलात्कार (Rape) केला, त्यामुळे ती गरोदर (Pregnant) राहिली. इथेच हे प्रकरण संपले नाही तर यानंतर तिला अतिशय भयानक प्रसंगाला सामोरे जावे लागले. अशा नरकयातना भोगाव्या लागतील याची तिनं कधी कल्पनाही केली नव्हती. ही महिला सैनिक राजकीय सल्लागाराने केलेल्या बलात्कारामुळे गर्भवती असल्याची माहिती हुकूमशहाला मिळाल्यावर जबरदस्तीने तिचा गर्भपात करण्यात आला, मात्र त्यासाठी वापरण्यात आलेली पद्धत अत्यंत भीषण होती. या महिलेला भूल (Anesthesia) किंवा कोणत्याही वेदनाशामक गोळ्या (Painkiller Drugs) न देता तिचा गर्भपात करण्यात आला. यामुळे तिला प्रचंड वेदना, त्रास सहन करावा लागला. या भयंकर अनुभवानंतर तिनं देश सोडण्याचा निर्णय घेतला आणि अनेक प्रयत्नानंतर ती उत्तर कोरियातून पळून जाण्यात यशस्वी ठरली. आता ती दुसऱ्या देशात मुक्त जीवन जगत आहे, मात्र आजही ती हा यातनामय आठवणी विसरू शकत नाही. तिला आपल्या या भूतकाळाची लाज वाटते.

हे वाचा-पोटगी म्हणून दिले 5 हजार 540 कोटी रुपये; वाचा 'शाही' घटस्फोटाची Inside Story

जेनिफरने सोशल मीडियावर (Social Media) आपल्या वेदनेला मुक्त वाट करून देताना उत्तर कोरियातील महिला सैनिकांसोबत (Women Soldiers) होणाऱ्या अन्यायालाही वाचा फोडली आहे. तिनं तिथल्या महिला सैनिकांना दिल्या जाणाऱ्या क्रूर वागणुकीच्या कहाण्याही सांगितल्या आहेत. इथे महिला सैनिकांसोबत क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या जातात, असं जेनिफरनं म्हटलं आहे. सैन्यातील महिलांचे शारीरिक शोषण केले जाते. तसंच त्यांना उपाशी ठेवलं जातं. महिला सैनिकांना दिवसातून फक्त तीन ते चार चमचे कॉर्न (Corn) खायला दिले जातात. त्यामुळे त्यांची मासिक पाळी (Periods) तीन ते चार महिन्यांतून एकदाच येते. तसंच कोणी गरोदर राहिल्यास त्या महिलेला नरकयातना भोगाव्या लागतात, असंही तिनं सांगितलं आहे. जेनिफरच्या या कहाणीमुळे उत्तर कोरियातील क्रूरतेचा आणखी एक अध्याय जगासमोर आला आहे.

First published:

Tags: North korea