Home /News /videsh /

अलिशान हवेली, महागड्या ठिकाणी सुट्टया, पोटगी म्हणून दिले 5 हजार 540 कोटी रुपये; वाचा 'शाही' घटस्फोटाची Inside Story

अलिशान हवेली, महागड्या ठिकाणी सुट्टया, पोटगी म्हणून दिले 5 हजार 540 कोटी रुपये; वाचा 'शाही' घटस्फोटाची Inside Story

मंगळवारी ब्रिटीश न्यायालयाने (British Court) दुबईच्या शासकाला आपली माजी पत्नी आणि त्यांच्या मुलांना 554 दशलक्ष पाउंड (5 हजार 540 कोटी रुपये) देण्याचे आदेश दिले आहेत. हा घटस्फोट ब्रिटनच्या इतिहासातील सर्वात महागड्या घटस्फोटांपैकी एक ठरला आहे.

पुढे वाचा ...
लंडन, 22 डिसेंबर : संयुक्त अरब अमिरातीचे पंतप्रधान आणि दुबईचे शासक शेख मोहम्मद बिन रशीद अल-मकतूम (Sheikh Mohammed bin Rashid al-Maktoum) आणि त्यांची माजी पत्नी हया बिंत अल-हुसेन (Haya bint al-Hussein) यांच्यातील कायदेशीर लढाईमुळे दुबईच्या राजघराण्याची आलिशान जीवनशैली जगासमोर आली आहे. मंगळवारी (21 डिसेंबर 2021) ब्रिटीश न्यायालयाने (British Court) दुबईच्या शासकाला (Dubai Ruler) आपली माजी पत्नी आणि त्यांच्या मुलांना 554 दशलक्ष पाउंड (5 हजार 540 कोटी रुपये) देण्याचे आदेश दिले आहेत. हा घटस्फोट ब्रिटनच्या इतिहासातील सर्वात महागड्या घटस्फोटांपैकी (Expensive divorces) एक ठरला आहे. सेटलमेंटची ही रक्कम (Settlement Amount) राजकुमारी हया, तिची मुलं आणि तिच्या ब्रिटीश वाड्याच्या देखभालीसाठी व भविष्यातील सुरक्षा खर्च भागवण्यासाठी वापरली जाणार आहे. घटस्फोटाच्या कार्यवाही दरम्यान या शाही जोडप्याच्या आलिशान जीवनशैलीबद्दल कोणती माहिती समोर आली आहे. एका डझनपेक्षा जास्त आलिशान हवेल्या शेख मोहम्मद बिन रशीद अल मकतूम, हे सध्या संयुक्त अरब अमिरातीचे पंतप्रधान आणि दुबईचे शासक आहेत. त्यांनी 2004 मध्ये राजकुमारी हया बिंत अल हुसेनशी निकाह केला होता. हया ही अल मकतूम यांची सहावी पत्नी होती. राजाने 2019 मध्ये राजकुमारी हयाला शरिया कायद्यानुसार (Sharia law) तिला कल्पना न देताच घटस्फोट दिलेला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हया दुबई सोडून यूकेमध्ये राहात आहे. राजकुमारीच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितलं की, तिच्याकडे आणि मुलांकडे दुबईत असताना अमर्याद संपत्ती होती. राजकुमारी हया यांच्याकडे डझनहून अधिक आलिशान हवेल्या, 400 दशलक्ष पाउंड्सची नौका आणि खासगी विमानांचा ताफा होता. याच्या प्रत्युत्तरात दुबईच्या शासकाच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, हयाला घरखर्चासाठी वार्षिक 83 दशलक्ष पाउंड होते, त्यापैकी 9 दशलक्ष पाउंड खर्च होत असे. मुलांच्या पैशांचा वापर दुबईचे 72 वर्षीय शासक अल मकतूम आणि त्यांची 47 वर्षीय माजी पत्नी हया यांची दीर्घकाळापासून कायदेशीर लढाई सुरू आहे. हया तिच्या जलीला (14) आणि झायेद (9) या दोन मुलांसह लंडनमध्ये राहते. सुनावणीदरम्यान, राजकुमारी हयाला 6.7 दशलक्ष पाउंडच्या एका पेमेंटबद्दल विचारण्यात आलं होतं. असं म्हटलं जातं की, राजकुमारी हयाचं तिच्या बॉडीगार्डसोबत अफेअर होतं. हे अफेअर लपविण्यासाठी तिनं 6.7 मिलियन पाउंड खर्च केले होते. इतकच नाही तर तिनं आपल्या मुलांच्या बँक खात्यातून ही रक्कम काढली होती.

लग्न वाचवण्यासाठी कपलने 'हाईट'च केली; असा मार्ग निवडला की तुम्हीही हैराण व्हाल

लंडनमध्ये आलिशान हवेली घटस्फोटातील पोटगीच्या एकूण रकमेपैकी 251.5 दशलक्ष पाउंड राजकुमारी हयाच्या लंडनमधील घराच्या देखभालीसाठी खर्च होणार आहेत. 2016 मध्ये हयानं केन्सिंग्टन पॅलेसजवळ 87.5 दशलक्ष पाउंड किमतीची एक हवेली (Luxurious mansion) विकत घेतली होती. तिच्या रिनोव्हेशनसाठी (Renovation) 14.7 दशलक्ष पाउंड खर्च करण्यात आले आहेत, असं न्यायालयाला सांगण्यात आलं. दुबईच्या शासकानं दिलेल्या रकमेतून हवेलीची 10 वर्षे देखभाल केली जाईल आणि घरकाम करणाऱ्या पाच कर्मचाऱ्यांचा पगार दिला जाईल. ही हवेली आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची असून यापुढेही तीची व्यवस्थित देखभाल केली जाईल, असं राजकुमारी हया म्हणाली आहे. या शिवाय बर्कशायरमध्ये असलेल्या कॅसलवुड हवेलीच्या (Castlewood mansion) देखभालीसाठीदेखील तिनं वर्षाकाठी 77 हजार पाउंड्सची मागणी केली आहे. 400 रेसिंग हॉर्स राजकुमारी हया आणि तिच्या मुलांकडे 60 पेक्षा जास्त रेसिंग घोडे (Racing horses) आहेत. त्या घोड्यांसाठी तिनं 75 दशलक्ष पाउंडची नुकसान भरपाई मागितली आहे. शेखसोबत लग्न झालं तेव्हा तिच्याकडे जवळपास 400 घोडे होते. आपल्याला जेव्हा इच्छा झाली तेव्हा-तेव्हा आपण घोडा विकत घेतला, अशी माहिती हयानं न्यायालयात दिली.

66 वर्षांच्या आजोबांना हवी परफेक्ट जोडीदार; तिच्यासाठी रस्त्यावरच लावलं होर्डिंग

सुट्यांसाठी होणारा खर्च हयाच्या लग्नादरम्यान, शाही कुटुंबानं इटलीमध्ये उन्हाळ्याच्या सुट्ट्या (Summer Vacations) घालवल्या होत्या. त्यासाठी 6 लाख 31 हजार पाउंड खर्च करण्यात आले होते. नंतर एकदा ग्रीसमधील सुट्ट्यांदरम्यान 2 लाख 74 हजार युरो इतकं हॉटेल बिल भरण्यात आलं होतं. याशिवाय राजकुमारी हयाला ब्रिटनमध्ये दोन आठवड्यांची सुट्टी आणि दरवर्षी नऊ आठवड्यांच्या परदेशवारीसाठी पैसे मिळत होते. न्यायाधीश फिलिप मूर म्हणाले की, दुबईच्या शासकाला आपल्या पत्नीला सुट्टीच्या खर्चासाठी वर्षाला 5.1 दशलक्ष पाउंड द्यावे लागतील. राजकुमारी हयाला सुट्टीच्या दिवसांमध्ये झालेल्या खर्चाची भरपाई म्हणून आणखी 1 दशलक्ष पाउंड दिले जातील. पाळीव प्राण्यांच्या देखभालीच्या खर्चासाठी दरवर्षी 2 लाख 77 हजार 50 पाउंडदेखील दिले मिळतील. यापैकी 25 हजार पाउंड घोडे खरेदी करण्यासाठी आणि 12 हजार पाउंड त्यांच्या खेळण्यांसाठी मिळणार आहेत, असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे.
First published:

Tags: Divorce, Dubai

पुढील बातम्या