Home /News /videsh /

जन्मताच तब्बल 24 तास खतरनाक सापांशी संघर्ष; जंगलात भयंकर अवस्थेत सापडली नवजात चिमुकली

जन्मताच तब्बल 24 तास खतरनाक सापांशी संघर्ष; जंगलात भयंकर अवस्थेत सापडली नवजात चिमुकली

खतरनाक अशा जंगलात ही चिमुकली दोन दिवस एकटीच होती.

    बँकॉक, 22 डिसेंबर : बाळाचा जन्म (Newborn baby) झाला की त्याला खूप जपावं लागतं. अगदी छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते. असं नवजात बाळ एखाद्या घनदाट जंगलात असेल तर त्याची काय अवस्था झाली असावी याची कल्पनाही आपल्याला नकोशी वाटते (Newborn Baby Found in Forest). अशाच साप आणि अजगरांचा डेरा असलेल्या जंगलाच असतो एका नवजात चिमुकलीने तब्बल 24 तास संघर्ष केला आहे (Rescue Team Found Newborn Baby in Forest). साधं गांडुळ दिसलं तरी किती तरी जणांना भीती वाटते. मग साप तर दूरची गोष्ट आणि अजगराचा विचार तर सोडूनच द्या. पण एका चिमुकलीला जन्मताच अशा खतरनाक प्राण्यांच्या जगात संघर्ष करावा लागला. थायलँडच्या (Thailand) क्राबी प्रांतातील (Krabi Province) एका जंगलात नवजात मुलगी सापडली आहे. डेली मेलच्या रिपोर्टनुसार काही लोक जंगलात रबर जमा करण्यासाठी गेले होते, तेव्हा त्यांना एक नवजात मुलगी सापडली. केळ्याच्या झाडांमध्ये ती होती. तिच्या चेहऱ्यावर जखमा होत्या आणि शरीरावर किडे होते. अशाच परिस्थितीत ती बराच वेळ होते. ती मोठमोठ्याने रडत होती. हे वाचा - VIDEO - बापरे बाप! महिलेने केसांमध्ये रबरऐवजी गुंडाळला चक्क जिवंत साप आणि... याची माहिती मिळताच रुग्णवाहिका आणि पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं. चिमुकलीला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ती डिहायड्रेटही झाली होती. म्हणजे तिच्या शरीरात पाणी नव्हतं. आता ती डॉक्टरांच्या देखरेखीत आहे. ज्या ठिकाणाहून ही मुलगी सापडली, ते खूप भयंकर जंगल आहे. तिथं तापमान 35 डिग्री सेल्सियस असतं. कोब्रा, अजगर असे प्राणीही असतात. अशा खतरनाक ठिकाणी ही मुलगी दोन दिवसांपासून एकटीच होती. तिच्यासोबत दुसरं कुणीच नव्हतं. पण अशा ठिकाणीही ही मुलगी जिवंत, सुरक्षित होती याचंच आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे. हे वाचा -धक्कादायक! जन्माच्या 5 व्या दिवशी मुलीला आली मासिक पाळी दरम्यान पोलिसांनी आता या मुलीच्या आईचा शोध सुरू केला. तिच्याविरोधात केसही दाखल केली जाणार आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Small baby, Snake, Thailand, World news

    पुढील बातम्या