मराठी बातम्या /बातम्या /Viral /

बापरे बाप! महिलेने केसांमध्ये रबरऐवजी गुंडाळला चक्क जिवंत साप आणि...; विचित्र फॅशनचा VIDEO पाहूनच फुटेल घाम

बापरे बाप! महिलेने केसांमध्ये रबरऐवजी गुंडाळला चक्क जिवंत साप आणि...; विचित्र फॅशनचा VIDEO पाहूनच फुटेल घाम

फॅशन म्हणून महिलेचं हे विचित्र एक्सपेरिमेंट पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे.

फॅशन म्हणून महिलेचं हे विचित्र एक्सपेरिमेंट पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे.

फॅशन म्हणून महिलेचं हे विचित्र एक्सपेरिमेंट पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे.

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 22 डिसेंबर : सध्या फॅशनच्या नावाखाली काहीही चालतं हे तुम्हालाही माहिती असेल. जगात असे काही लोक आहे जे अशी विचित्र फॅशन करतात. सध्या अशाच एका महिलेचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. जिने तर फॅशनच्या बाबतीच हद्दच पार केली आहे. फॅशन म्हणून तिने आपल्या केसांना चक्क जिवंत सापच गुंडाळला आहे (Woman wrapped snake around hair).

केसांसाठी बऱ्याच एक्ससेरीज असतात. रबर, हेअरबँड, रिबन, क्लिप याशिवाय बरंच काही असतं. पण या महिलेने आपल्या केसांसाठी अशी कोणतीच हेअर एक्सेसरीज वापरली नाही तर तिने एका जिवंत सापाचा वापर केला आहे. केसांना रबर लावण्याऐवजी तिने जिवंत साप (Snake video) गुंडाळला आहे.

व्हिडीओत पाहू शकता एक महिला चालताना दिसते आहे. तिने केसांचा बन बांधला आहे. पण या बनला तिने कोणता रबर किंवा क्लिप लावला नाही आहे. तर एक साप गुंडाळाला आहे. केसांमध्ये साप घेऊन ही महिला एका मॉलमध्येही घुसते.

हे वाचा - Monkey Vs Dog खुनी गँगवॉरनंतर VIRAL होतोय माकडाचा हा VIDEO; पाहूनच पाणावतील डोळे

महिलेच्या डोक्यात काहीतरी विचित्र दिसल्याने लोकांच्या नजरा तिच्याकडे खिळल्या आणि त्यांना जेव्हा तिच्या केसात साप आहे हे समजलं तेव्हा सर्वांना घामच फुटला. काही लोकांनी तर आपला मोबाईल काढून याचा व्हिडीओही बनवला. महिलेचं फॅशन म्हणून हे विचित्र एक्सपेरिमेंट पाहून सर्वांना धक्का बसणं साहजिकच आहे.

इतर लोक तिच्या डोक्यात सापाला पाहून घाबरले आहेत पण तिच्या चेहऱ्यावर मात्र बिलकुल भीती दिसत नाही आहे. ती बिनधास्तपणे शॉपिंग करते आहे. जसं काही तिने याआधीसुद्धा केसांना साप गुंडाळला असावा. सापही केसांमध्ये एकदम घट्ट बसला आहे.

हे वाचा - VIDEO - Nagin dance करत करत जवळ आले आणि 2 तरुणांनी असं काही केलं की सर्वच शॉक

snake._.world इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही काय विचार करताय असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला याबाबत काय वाटतं हे आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

First published:

Tags: Shocking viral video, Snake, Snake video, Viral, Viral videos