मुंबई, 17 जानेवारी : भारताला संयुक्त राष्ट्र परिषदेत मोठे यश मिळाले आहे. 26\11 हल्ल्याचा मास्टरमाईंड अब्दुल रहमान मक्की याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषीत करण्यात आले आहे. मक्कीला संयुक्त राष्ट्र परिषदेने (यूएनएससी) आतंरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले आहे. मक्की हा लश्कर-ए-तोयबाचा म्होरक्या म्हणून ओळखला जातो. मुंबईत झालेल्या 26\11 दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदचा मेहुणा आहे. मक्कीने अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग घेतला आहे. मागच्या वर्षी जून 2022 मध्ये चीनने अब्दुल रहमान मक्कीची पाठराखण केली होती. यामुळे या मुद्द्यावर भारताने चीनला होते.
काल झालेल्या संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेच्या समितीने अब्दुल रहमान मक्कीला आतंरराष्ट्रीय दहशत वाद्यांच्या यादीत घातले आहे. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेकडून मक्कीला पैशाचा मोठा व्यवहार करता येणार नाही. तसेच त्याला शस्त्रे खरेदी करण्याचा कोणाताही अधिकार नसेल, याचबरोबर त्याला जेवढा अधिकार आहे तेवढाचे तो प्रवास करू शकेल असे निर्बंध मक्कीवर घालण्यात आले आहेत.
हे ही वाचा : अटक केलेल्या दहशतवाद्यांनी दिली कबुली, म्हणाले, शिवसेना आणि काँग्रेसचे नेते....
भारत आणि अमेरिकेने यापूर्वीच मक्कीला त्यांच्या कायद्यांतर्गत दहशतवाद्यांच्या यादीत टाकले आहे. अब्दुल रहमान मक्की याला आतंरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याचा प्रस्ताव भारताने मागच्या वर्षी संयुक्त राष्ट्रमध्ये मांडला होता. मात्र याला चीनने या प्रस्तावााला विरोध केला होता. या मुद्द्यावरून भारत आणि चीनमध्ये मोठे घमासान झाले होत.
अब्दुल रहमान मक्की हा दहशतवादांना आर्थिक रसद पुरवणे, तरुणांना हल्ल्यासाठी प्रवृत्त करणे, भारताविरुद्ध विशेषतः जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले करण्याचा कट रचल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले होते. मक्की हा लश्कर-ए-तोयबाचा म्होरक्या आणि मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदचा मेहुणा आहे. त्याचा अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहभाग होता. सईद यांच्यानंतर मक्कीकडेच तोयबाची सूत्रे आहेत. तसेच तो पाकिस्तानमधील जमाद-उद-दावा राजकीय पक्षाचाही प्रमुख आहे.
हे ही वाचा : विमानाच्या चाकात लपून केला 6500 KM प्रवास, पण 10 तासानंतर...; आजही थरकाप उडवते त्या 2 भावांची कहाणी
2010 मध्ये त्याने भारताविरोधात गरळ ओकली होती. त्यामुळे तो चर्चेत आला होता. पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाच्या आठ दिवसांपूर्वी त्यांनी मुझफ्फराबादमध्ये भाषण करून पुण्यासह भारतातील तीन शहरांमध्ये दहशतवादी हल्ले करण्याची धमकी दिली होती. भारताच्या मागणीवरून अमेरिकेने मक्कीला दहशतवादी घोषित केले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: India china, Terrorists