नवी दिल्ली, 29 नोव्हेंबर : विमानात (flight Travel) बसण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. आपला पहिला विमान प्रवास कायम आठवणीत राहावा यासाठी लोक विविध प्रकारच्या गोष्टी करतात. मात्र विचार करा एखादी व्यक्ती विमानाच्या लँडिंग गियरवर बसून प्रवास करीत असेल तर तुम्ही काय म्हणाल...अशीही हैराण करणारी बाब समोर आली आहे. अमेरिकेतून अशीच एक घटना समोर आली आहे. येथील एका व्यक्तीने विमानाच्या लँडिग गियरच्या जवळ बसून प्रवास केला. या तरुणाचे काही फोटोदेखील व्हायरल झाले आहे.
ही घटना अमेरिकन एयरलाइन्समधील असल्याचं समोर आलं आहे. 'न्यूयॉर्क टाइम्स'च्या रिपोर्टनुसार, ग्वाटेमाला ते मियामीच्या प्रवासात व्यक्ती विमानाच्या आत नाही तर विमानाच्या लँडिग गियरवर (Aircraft landing gear) बसला होता. मात्र तो बसला तेव्हा कोणीच त्याला पाहिलं नाही. इतकच नाही तर विमान तब्बल दोन तास 30 मिनिटांपर्यंत हवेत होतं आणि ही व्यक्ती तेथेच बसून होती.
आश्चर्यची बाब व्यक्ती तेथून अजिबात हलला नाही. मियामीमध्ये जसं विमान लँड झालं, लोक विमानातून उतरू लागले आणि कर्मचारी आपलं काम करू लागला. तेव्हा अचानक एका कर्मचाऱ्याची नजर त्या व्यक्तीवर गेली. ही व्यक्ती लँडिग गियरवर बसली होती आणि थंडीमुळे आकडला होता. दोन कर्मचाऱ्यांनी त्याला तेथून बाहेर काढलं आणि रुग्णालयात नेलं. त्याची प्रकृती ठीक असल्याचं सांगण्यात आलं आहे.
हे ही वाचा-डिलिव्हरीवेळी लेबर रुममध्ये दीरही राहिल हजर; पतीच्या हट्टामुळे पत्नीचा संताप
रिपोर्टमध्ये दिल्यानुसार, ग्वाटेमाला ते मियामी पोहोचण्यासाठी विमानाला तब्बल 2 तास 30 मिनिटं लागतात. तोपर्यंत ही व्यक्ती 33,000 फूट उंच लँडिंग गियरजवळ बसली होती. या व्यक्तीचे काही फोटो समोर येताच लोकही हैराण झाले. तो जीवंत कसा राहिला, याबद्दलही आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: America, Travel by flight