Bubonic plague: चीननंतर आता अमेरिकेतही सापडलं भयंकर ब्यूबॉनिक प्लेगचं एक प्रकरण

Bubonic plague: चीननंतर आता अमेरिकेतही सापडलं भयंकर ब्यूबॉनिक प्लेगचं एक प्रकरण

कोरोनाव्हायरस या अदृश्य रोगाशी सारं जग दोन हात करत असताना आता आणखी एक रोगाची चाहुल लागली आहे.

  • Share this:

वॉशिंग्टन, 15 जुलै : कोरोनाव्हायरस या अदृश्य रोगाशी सारं जग दोन हात करत असताना आता आणखी एक रोगाची चाहुल लागली आहे. या आजाराचे नाव आहे ब्यूबॉनिक प्लेग (Bubonic plague). या आजारामुळं 5 कोटी लोकांचा मृत्यू झाला. आता पुन्हा एकदा हा जगातील काही भागांमध्ये पसरत आहे. याआधी चीनमध्ये ब्यूबॉनिक प्लेगची दोन प्रकरणं समोर आली होती. आता अमेरिकेतही ब्यूबॉनिक प्लेगचं एक प्रकरणं समोर आलं आहे.

अमेरिकेतील कॉलोराडो इथं एका खारीला (Squirrel) ब्यूबॉनिक प्लेग झाल्याचे आढळून आले आहे. अधिकृतपणे खार पॉझिटिव्ह आल्याचे सांगण्यात आले आहे. 11 जुलै रोजी ही खार पॉझिटिव्ह आढळून आली होती. सध्या या खारीवर उपचार सुरू आहेत. या आजाराचा प्राण्यांवर सर्वप्रथम परिणाम होत असल्याचे याआधी स्पष्ट करण्यात आले होते.

वाचा-आनंदाची बातमी! लवकरच मिळणार मेड इन इंडिया लस, ह्यमुन ट्रायलला झाली सुरुवात

असा पसरतो ब्यूबॉनिक प्लेग

हा रोग मुख्यत: जंगली उंदरांमध्ये आढळणार्‍या बॅक्टेरियांमुळे होतो. या बॅक्टेरियाचे नाव येरसिनिया पेस्टिस बॅक्टेरियम (Yersinia Pestis Bacterium) आहे. हा जीवाणू शरीरातील लिम्फ नोड्स, रक्त आणि फुफ्फुसांवर हल्ला करतो. यामुळे बोटं काळी पडतात व सडतात. ब्यूबॉनिक प्लेग प्रथम जंगली उंदरांना होतो. उंदरांच्या मृत्यूनंतर या प्लेगचे जीवाणू मानवी शरीरात प्रवेश करतात. उंदरांच्या मृत्यूनंतर दोन ते तीन आठवड्यांनंतर मानवामध्ये प्लेग पसरतो.

वाचा-कोरोनाविरुद्धच्या लढ्यात यशस्वी पाऊल, 'या' देशाच्या लशीचा पहिला टप्पा पूर्ण

याआधीच कोट्यवधी लोकांचा मृत्यू

जगभरात ब्यूबॉनिक प्लेगची सुमारे 3248 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. त्यापैकी 584 लोकांचा मृत्यू झाला आहे. या वर्षांमध्ये, बहुतेक प्रकरणे डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो, मेडागास्कर, पेरूमध्ये आढळून आली. इनर मंगोलियन स्वायत्त प्रदेश, बयन्नुर यांनी प्लेगच्या प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी तिसर्‍या टप्प्याचा इशारा दिला आहे. शनिवारी बयन्नुर येथील रूग्णालयात ब्यूबॉनिक प्लेगच्या संशयास्पद दोन घटना उघडकीस आल्या. स्थानिक आरोग्य विभागाने घोषणा केली की हा अलर्ट 2020 अखेरपर्यंत असेल.

वाचा-...म्हणून कोरोनावर यशस्वी उपचार करणारी रशियन लस लगेच बाजारात उपलब्ध होणार नाही

Published by: Priyanka Gawde
First published: July 15, 2020, 1:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading