जाहिरात
मराठी बातम्या / देश / आनंदाची बातमी! लवकरच मिळणार मेड इन इंडिया लस, ह्यमुन ट्रायलला झाली सुरुवात

आनंदाची बातमी! लवकरच मिळणार मेड इन इंडिया लस, ह्यमुन ट्रायलला झाली सुरुवात

लस कुणाला मिळणार हे ठरवण्यासाठी आणि लसीकरणात प्राधान्य मिळणाऱ्यांच्या याद्या तयार करण्याचं काम सुरू झालं आहे. सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांना तसं कळवून त्यांच्याकडून यासंदर्भातला डेटाबेस मागवण्यात येणार आहे.

लस कुणाला मिळणार हे ठरवण्यासाठी आणि लसीकरणात प्राधान्य मिळणाऱ्यांच्या याद्या तयार करण्याचं काम सुरू झालं आहे. सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांना तसं कळवून त्यांच्याकडून यासंदर्भातला डेटाबेस मागवण्यात येणार आहे.

कंपनीने सांगितले आहे की, ZYCoV-D ही लस प्लाझ्मिड डीएनए लस, प्री-क्लिनिकल टॉक्सिसिटी अभ्यासामध्ये सुरक्षित मानली गेली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 15 जुलै : जगभरातील सर्व देश कोरोनावर लस शोधण्यासाठी दिवसरात्र मेहनत करत आहे. दोन भारतीय कंपन्याही या शर्यतीत सामिल झाल्या आहेत. यातच आता भारतीय औषधी कंपनी जायदस कॅडिलाने (Zydus Cadilla) बुधवारी सांगितले की त्यांनी संभाव्य कोरोना लसीसाठी मानवी चाचणीला (Human Trial) सुरू केल्या आहेत. कंपनीने सांगितले आहे की, ZYCoV-D ही लस प्लाझ्मिड डीएनए लस, प्री-क्लिनिकल टॉक्सिसिटी अभ्यासामध्ये सुरक्षित मानली गेली आहे. यापूर्वी, या कोरोना लसीच्या क्लिनिकल चाचण्यांमध्ये प्रतिकारशक्ती आणि प्रतिकारशक्ती चाचण्यांचे चांगले परिणाम दिसून आले आहेत. याआधी मॉडर्नना (Moderna) या अमेरिकन कंपनीच्या लशीनं पहिली चाचणी यशस्वी पार केली. न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासानुसार असे म्हटले आहे की 45 निरोगी लोकांवर या लसीची पहिली चाचणी घेण्यात खूप चांगले परिणाम दिसून आले. मोडर्नाच्या लसविषयी आणखी एक चांगली गोष्ट म्हणजे याचे कोणत्याही रुग्णांवर साइट इफेक्ट दिसून आले नाही आहेत. वाचा- कोरोनाविरुद्धच्या लढ्यात यशस्वी पाऊल, ‘या’ देशाच्या लशीचा पहिला टप्पा पूर्ण Zydusने याच महिन्यात केली होती घोषणा अहमदाबादमधील लसी तंत्रज्ञान केंद्रातील पूर्वसूचना यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर Zyduनं या महिन्याच्या सुरूवातीला जाहीर केले की त्यांची ZyCoV-D लशीची मानवावर चाचणी केली जाणार आहे. DCGIने मनुष्यावरील या लसीच्या चाचणीसाठी देखील मान्यता देण्यात आली आहे. औषधेही होणार तयार दरम्यान, बर्‍याच भारतीय कंपन्या कोरोना औषधेही बनवत आहेत. मंगळवारी बायोफॉर इंडिया फार्मास्युटिकल्सने (Biophore India) कोव्हिड -19 औषध फविपिरावीर (Favipiravir) तयार करण्यासाठी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) कडून परवाना मिळविला आहे. हे औषध कोव्हिड -19 सौम्य ते मध्यम प्रकरणांमध्ये वापरले जाते. याव्यतिरिक्त, डीसीजीआयने भारतातील सक्रिय औषधी घटकांच्या निर्मिती आणि निर्यातीलाही मान्यता दिली आहे. वाचा- …म्हणून कोरोनावर यशस्वी उपचार करणारी रशियन लस लगेच बाजारात उपलब्ध होणार नाही

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात