...म्हणून कोरोनावर यशस्वी उपचार करणारी रशियन लस लगेच बाजारात उपलब्ध होणार नाही

...म्हणून कोरोनावर यशस्वी उपचार करणारी रशियन लस लगेच बाजारात उपलब्ध होणार नाही

रशियानं कोरोनाची लस तयार असल्याचा दावा केला आहे. हा दावा खरा असला तरी, ही लस बाजारात उपलब्ध होण्यासाठी बराच कालावधी जाणार आहे.

  • Share this:

मॉस्को, 15 जुलै : जगभरात कोरोना थैमान घालत आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असताना, ठोस उपाय मात्र अद्याप सापडले नाही आहेत. 150 देश कोरोनाची लस शोधण्याच्या प्रयत्नात आहेत. काहींना यश आले आहे तर काहींच्या लसीवर ह्युमन ट्रायल बाकी आहे. यात रशियानं कोरोनाची लस तयार असल्याचा दावा केला आहे. हा दावा खरा असला तरी, ही लस बाजारात उपलब्ध होण्यासाठी बराच कालावधी जाणार आहे. रशियाच्या सेचेनोव्ह विद्यापीठाने ही लस तयार केली आहे. मानवी परीक्षणामध्ये ही लस यशस्वी ठरली आहे.

रशियानं तयार केलेल्या या लसीने क्लिनिकल चाचणी पूर्ण केली आहे. मात्र असे असले तरी हा केवळ पहिला टप्पा आहे. सोमवारपासून या लसीच्या ट्रायचा दुसरा टप्पा सुरू झाला. त्याचा निकाल येणं अद्याप बाकी आहे. त्यामुळे पहिला टप्पा या लसीनं पार केला असला तरी, बाजारात उपलब्ध होण्यासाठी अजून बराच कालावधी लागण्याची शक्यता आहे.

वाचा-कोरोनामुक्त रुग्णांना प्लाझ्मा दान करणं बंधनकारक करा; IMA ची सरकारला सूचना

इंडियन एक्सप्रेसनं दिलेल्या माहितीनुसार, 18 जूनपासून या लसीच्या पहिल्या टप्प्यातील ट्रायलला सुरुवात झाली. यासाठी सैन्य दलातूनच स्वयंसेवकांची निवड करण्यात आली. रशियाच्या TASS न्यूज एजन्सीनं दिलेल्या वृत्तानुसार 10 जुलै रोजी 15 जुलैपर्यंत हे ट्रायल संपणार आहे. तर, 13 जुलैपासून दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होईल.

वाचा-अरे बापरे! फक्त एका लिफ्टमुळे एकट्या महिलेनं नकळत 71 जणांना केलं कोरोना संक्रमित

3 फेजमध्ये होणार चाचणी

पहिल्या टप्प्यामध्ये छोटया गटावर लसीची सुरक्षितता आणि साइड इफेक्ट यांबाबत तपासणी करण्यात आली. यासाठी 15 जुलैपर्यंत या ट्रायलची नोंद घेण्यात येणार आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होईल. यामध्ये लसीची परिणामकारकता आणि रोगप्रतिकार शक्ती यांची तपासणी होईल. यानंतर महत्त्वपूर्ण तिसऱ्या टप्प्याला सुरुवात होईल. या टप्प्यात हजारो लोकांवर चाचणी केली जाईल. यात लसीमुळे कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी ही लस किती उपायकार आहे. तसेच रोगप्रतिकारक शक्तीला चालन मिळाली आहे का? हे पाहिले जाईल. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याच्या तुलनेत तिसऱ्या टप्प्याला सर्वात जास्त कालावधी लागतो.

तिसऱ्या टप्प्यानंतर काय?

या लसीनं तिन्ही टप्पे यशस्वी पार केल्यानंतर ही लस बाजारात उपलब्ध होऊ शकते. याआधी लसीच्या निर्मितीसाठी अनेक प्रशासकिय परवानग्या घ्याव्या लागतात. ही प्रक्रियाही फार मोठी आहे.

वाचा-प्रेमासाठी काहीपण; महिला पोलिसाने प्रियकराला केलं क्वारंटाईन

Published by: Priyanka Gawde
First published: July 15, 2020, 9:26 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading