• Home
  • »
  • News
  • »
  • videsh
  • »
  • कायच्या काय! सार्वजनिक ठिकाणी पादल्यामुळे नागरिकाला भरावा लागला 9 हजाराचा दंड

कायच्या काय! सार्वजनिक ठिकाणी पादल्यामुळे नागरिकाला भरावा लागला 9 हजाराचा दंड

एका नागरिकानं पोलिसांसमोरच (Police)पादण्याची (Fart) कृती केली. त्याचा चांगलाच फटका त्याला बसला. यासाठी त्याला तब्बल 9 हजार रुपये दंड भरावा लागला.

  • Share this:
नवी दिल्ली 12 एप्रिल: सार्वजनिक ठिकाणी कसे वागावे, कसे वागू नये याचे काही संकेत असतात. पण काही लोकांना असे संकेत पाळण्यात काहीही स्वारस्य नसते. आपण काही चुकीची कृती केली असंही काहींना वाटत नाही, तर काहीवेळा काहीजण जाणूनबुजून असं वागत असल्याचंही निदर्शनास येतं. मात्र, व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली अशा असभ्य कृत्याचे समर्थन करता येत नाही. कायद्याचा बडगा बरोबर बसतो, हेच ऑस्ट्रियातील (Austria) एका प्रकरणातून स्पष्ट झालं आहे. ऑस्ट्रियातील एका नागरिकानं जाणूनबुजून पोलिसांसमोरच (Police) पादण्याची (Fart) कृती केली. त्याचा चांगलाच फटका त्याला बसला. यासाठी त्याला तब्बल 9 हजार रुपये दंड भरावा लागला. आधी या नागरिकाला भरपूर दंड सुनावण्यात आला. मात्र, त्यानं न्यायालयात (Court) याप्रकरणी दाद मागितल्यानंतर न्यायालयानं दंडाची रक्कम कमी केल्यामुळे आता त्याला 9 हजार रुपये द्यावे लागणार आहेत. प्रत्यक्षात त्याला पोलिसांनी 500 युरो म्हणजेच तब्बल 44 हजार रुपये दंड (Fine) ठोठावला होता. तो न्यायालयानं कमी करत 100 युरो म्हणजे 8 हजार 892 रुपये केला. लॅडबिबलनं (Ladbible) दिलेल्या वृत्तानुसार,गेल्या वर्षी व्हिएन्नामध्ये (Vienna) ही घटना घडली होती. एका व्यक्तीनं पोलिसांसमोर पादण्याची कृती करत सार्वजनिक ठिकाणी पाळण्यात येणाऱ्या सभ्यतेच्या संकेताचा भंग केल्यानं पोलिसांनी त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली होती. ही व्यक्ती एका उद्यानात एका बाकावर बसली होती. पोलीस समोर येताच त्यानं पादण्याची कृती केली. त्यानं जाणूनबुजून ही कृती केली तसंच नाव, इतर माहिती विचारल्यावर त्याबाबतही पोलिसांना कोणतंही सहकार्य केलं नाही, असं पोलिसांनी सांगितलं. सोज्वळ सुनेचा ग्लॅमरस अवतार; पाहा रश्मी देसाईचं बोल्ड फोटोशूट ऑस्ट्रियात फक्त बोलण्याचेच नाही तर इतर आवाजांनाही व्यक्ती स्वातंत्र्यात गणलं जातं. या व्यक्तीनं पोलिसांनी केलेल्या दंडाबाबत न्यायालयात दाद मागितली. ही क्रिया नैसर्गिक आहे, त्यानं जाणीवपूर्वक ही कृती केली असली तरी त्याला पादण्याचे स्वातंत्र्य आहे. त्यामुळं त्यावेळी पोलिसांच्या दिशेला वाहणाऱ्या वाऱ्यालाही दोषी मानलं पाहिजे, असा दावा त्यानं केला. त्यावर न्यायालयानं या व्यक्तीची ही कृती सभ्यतेच्या मर्यादेचा (Boundaries of Decency) भंग करणारी आहे, असं नमूद केलं. मात्र, हा गुन्हा फार गंभीर नसल्यानं आणि त्याचा पहिलाच गुन्हा असल्यानं दंडाची रक्कम कमी केली. त्यामुळं फक्त पादण्यामुळं सोसावा लागणार 44 हजारांचा भूर्दंड केवळ 9 हजार रुपयांवरच निभावला. या व्यक्तीला पादल्यामुळे दंड भरावा लागला असला तरी पादण्यातून पैसे कमावणारेही लोक आहेत. एक 48 वर्षीय महिला आपले पादण्याचे व्हिडिओ विकून त्याबदल्यात महिन्याला 4 हजार 200 डॉलर्स म्हणजे साधारण साडेतीन लाख रुपये कमावत असल्याचं वृत्त दोन आठवड्यांपूर्वीच प्रसिद्ध झालं होतं. दक्षिण कॅरोलिना इथं राहणारी एम्मा मार्टिन (Emma Martin) असं या महिलेचं नाव असून ती आधी पर्यटन एजंट म्हणून काम करत होती. 1999 पासून तिनं आपले पादण्याचे व्हिडिओ (Farting Videos) इंटरनेटवर टाकण्याचा अजब उद्योग सुरू केला आणि चक्क त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. 20 वर्षांहून अधिक काळ ती हा अजब व्यवासाय करत असून आपले पादण्याचे व्हिडिओ पाहण्याकरता ती दरमहा 4.99 डॉलर्स शुल्क आकारते. आपला परफॉर्मन्स उत्तम व्हावा यासाठी ती काटेकोरपणे डाएट (DIET) करते. तिच्या डाएटमध्ये वेगवेगळ्या प्रकारची सलाड्स, अॅव्हाकॅडो, अॅस्पॅरागस आदींचा समावेश असतो. ती जास्तीत जास्त मेक्सिकन पदार्थ (Mexican Food) खाते तसेच कोलस्लो विथ बेक्ड बीन्स हा तिचा आवडता पदार्थ असल्याचं तिनं डेलीमेलशी बोलताना सांगितलं.
First published: