रश्मी देसाई ही छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. अभिनयासोबतच ती सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ती कायम चर्चेत असते. यावेळी देखील तिनं असंच एक चकित करणारं फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटमध्ये रश्मीचा बोल्ड आणि ग्लॅमरस अवतार पाहायला मिळत आहे. रश्मीनं आजवर अनेक मालिकांमध्ये सोज्वळ सूनेच्या भूमिका साकारल्या आहेत. या पार्श्वभूमीवर तिचा हा ग्लॅमरस अवतार पाहून नेटकरी देखील चकित झाले आहेत. रश्मीनं 2002 साली कन्यादान या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. त्यानंतर गजब भली रामा, नदिया के तीर, कब हो गुनाह हमार, पप्पू से प्यार हो गई यांसारख्या अनेक भोजपुरी चित्रपटांमध्ये ती झळकली. 2008 साली तिनं रावण या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. यामध्ये तिनं मंदोदरी ही मुख्य व्यक्तिरेखा साकारली होती. तिला खरी लोकप्रियता मिळाली ती उत्तरण या मालिकेमुळं. मालिकेंसोबतच तिनं बिग बॉस, झलक दिखलाजा, नच बलिये यांसारख्या रिअलिटी शोंमध्ये देखील भाग घेतला आहे. तिला खरी लोकप्रियता मिळाली ती उत्तरण या मालिकेमुळं. मालिकेंसोबतच तिनं बिग बॉस, झलक दिखलाजा, नच बलिये यांसारख्या रिअलिटी शोंमध्ये देखील भाग घेतला आहे.