मराठी बातम्या /बातम्या /विदेश /सौंदर्याचे side effects!Jealous होऊन कुणीच करत नाही मैत्री, वाचा सौंदर्यवतीची व्यथा

सौंदर्याचे side effects!Jealous होऊन कुणीच करत नाही मैत्री, वाचा सौंदर्यवतीची व्यथा

आपल्या सौंदर्यामुळे आपल्यासोबत (A girl shares side effects of her beauty on social media) एकही मुलगी मैत्री करायला तयार होत नसल्याची कैफियत एका तरुणीनं सोशल मीडियावरून मांडली आहे.

आपल्या सौंदर्यामुळे आपल्यासोबत (A girl shares side effects of her beauty on social media) एकही मुलगी मैत्री करायला तयार होत नसल्याची कैफियत एका तरुणीनं सोशल मीडियावरून मांडली आहे.

आपल्या सौंदर्यामुळे आपल्यासोबत (A girl shares side effects of her beauty on social media) एकही मुलगी मैत्री करायला तयार होत नसल्याची कैफियत एका तरुणीनं सोशल मीडियावरून मांडली आहे.

न्यूयॉर्क, 3 नोव्हेंबर: आपल्या सौंदर्यामुळे आपल्यासोबत (A girl shares side effects of her beauty on social media) एकही मुलगी मैत्री करायला तयार होत नसल्याची कैफियत एका तरुणीनं सोशल मीडियावरून मांडली आहे. एखाद्याचं सौंदर्य हे त्याच्यासाठी (Problem of beauty) अडचण किंवा अडथळा ठरू शकलं, हे तुम्ही कधी ऐकलं आहे? नसेल तर अमेरिकेतील एरियानाची कैफियत तुम्ही वाचा.

सौंदर्याचे साईड इफेक्ट्स

शाळेत असल्यापासून आपल्याशी कुणीच मैत्री करत नसल्याचा अनुभव एलियाना नावाच्या तरुणीनं शेअर केला आहे. आपल्याला नेहमी हा प्रश्न पडायचा. आपण इतरांसारखेच राहतो, वागतो, बोलतो. मात्र तरीही इतरांसारख्या मैत्रिणी आपल्याला का मिळत नाहीत? आपली कुणाशीच घट्ट मैत्री का होत नाही? असे प्रश्न पडत असल्याचं एलियाना म्हणते. आपल्या टिकटॉक अकाउंटवरून याबाबतचे अनुभव सांगणारा एक व्हिडिओ तिने शेअर केला आहे.

कॉलेजमध्ये झाला साक्षात्कार

शाळेप्रमाणेच कॉलेजमध्येदेखील एलियानाची मुलींसोबत मैत्री होत नसे. मुली तिच्यापासून चार हात लांबच राहत. तू इतकी सुंदर आहेस की तुझ्याशी मैत्री करायलाच नको वाटतं, असं त्या म्हणत. त्यामुळे एलियानाला मित्र तर अनेक मिळाले, मात्र मैत्रिणी मिळत नसल्याचं वाईट वाटत होतं. एक दिवस तिने आईला याबाबत सांगितलं. त्यावेळी तुझ्या सौंदर्यामुळेच कुणी तुझ्याशी मैत्री करत नसल्याचं आईनं सांगितलं. मात्र यात वाईट वाटण्यासारखं काही नसून तो मानवी स्वभावाचा एक पैलू असल्याचंही आईनं सांगितलं. त्यानंतर एलियानाला वाटणारी खंत कमी झाली.

हे वाचा- जगातलं सगळ्यात महागडं फळ! एका किलोच्या किंमतीत येईल अंगभर सोनं

नेटिझन्सकडून समर्थन

अनेकदा सौंदर्य हे शाप ठरतं आणि त्याचे काही साईड इफेक्ट्स असतात, या एलियानाच्या दाव्याला अनेकांनी पुष्टी दिली आहे. आपल्यालादेखील थोड्याफार फरकाने असेच अनुभव आल्याचं त्यांनी म्हटलं आहे. टिकटॉकवर हा व्हिढिओ आतापर्यंत 3 कोटी 50 लाख वेळा पाहिला गेला आहे. तर आपल्यापेक्षा अधिक सुंदर मुलींना पाहून इतर मुली जळत असतात, असा शेरादेखील काहींनी पोस्ट केला आहे.

First published:
top videos

    Tags: America, Beauty queen, Friendship, Tik tok