मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

बाहुल्यांशी खेळण्याच्या वयात ती झाली आई, लोकांना वाटतं हा मुलगा नव्हे भाऊच!

बाहुल्यांशी खेळण्याच्या वयात ती झाली आई, लोकांना वाटतं हा मुलगा नव्हे भाऊच!

वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी आई बनलेल्या एका मुलीनं (Girl gave birth to baby at the age of 13) तिच्या आयुष्याची कहाणी टिकटॉकवरून जगासमोर आणली आहे.

  • Published by:  desk news

वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी आई बनलेल्या एका मुलीनं (Girl gave birth to baby at the age of 13) तिच्या आयुष्याची कहाणी टिकटॉकवरून जगासमोर आणली आहे. मातृत्व हा स्त्रियांच्या आयुष्यातील एक मोठा भाग असतो. मात्र एका विशिष्ट(Right age for motherhood) वयानंतर मातृत्वाचा विचार करण्यात येतो. एका मुलीनं मात्र वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षीच (Delivered baby at 13) माता बनण्याचा निर्णय घेतला आणि तो तडीस नेला.

शाळेत असताना प्रेग्नंट

टिकटॉकच्या व्हिडिओत दिलेल्या माहितीनुसार गॅबी ही अवघ्या 13 वर्षांची असताना प्रेग्नंट राहिली. त्यावेळी ती आठवीत शिकत होती. गर्भपात न करता आपल्या बाळाला जन्म देण्याचा निर्णय़ तिने घेतला आणि तिच्या पालकांनीदेखील या निर्णयात तिला पाठिंबा दिला. गॅबी ही त्या अवस्थेतही रोज शाळेत जात होती. मात्र प्रेग्नन्सीच्या अखेरच्या काही दिवसांत मात्र तिला शाळेत न पाठवण्याचा निर्णय घेतला. घरातच तिचं शिक्षण सुरू करण्यात आलं आणि तिच्या तब्येतीचीही काळजी घेण्यात आली.

गॅब्रीने दिला बाळाला जन्म

नऊ महिन्यानंतर ग्रॅबीने एका गोंडस बाळाला जन्म दिला. बाळ आणि आई यांच्यात केवळ 13 वर्षांचाच फरक असल्यामुळे आपल्या पोटी आपला लहान भाऊच जन्माला आला, असं ग्रॅब्रीला वाटलं. शिक्षण पूर्ण करत तिने लवकरच पैसे कमवायला सुरुवात केली आणि आपण कमी वयातही बाळाची अगदी व्यवस्थित काळजी घेऊ शकतो, हे सिद्ध केलं. गॅब्री आता 21 वर्षांची आहे आणि बाळ 8 वर्षांचं झालं आहे. दोघंही सुखरूप असून आनंदानं आयुष्य जगत असल्याचं तिनं या व्हिडिओत म्हटलं आहे.

हे वाचा- schनशीबवान! पठ्ठ्याला लागला जॅकपॉट; खरेदी केलेल्या वीसही लॉटरी एकाच वेळी जिंकला

लोकांना पडले अनेक प्रश्न

या घटनेबाबत लोकांना अनेक प्रश्न पडल्याचं दिसतं. वस्तुस्थिती माहित नसलेल्या अनेकांना ग्रॅबीचं बाळ हे तिचा भाऊच आहे, असं वाटतं. तर एवढ्या कोवळ्या वयात मुलाची जबाबदारी देणं योग्य आहे का, अशा सवालही काही नेटिझन्सनी उपस्थित केला आहे.

First published:

Tags: Mother, Pregnancy, School student