मराठी बातम्या /बातम्या /विदेश /White House सोडल्यावर डोनाल्ड ट्रम्प राहायला कुठं गेले पाहा; डोळे विस्फारतील

White House सोडल्यावर डोनाल्ड ट्रम्प राहायला कुठं गेले पाहा; डोळे विस्फारतील

डोनाल्ड ट्रम्प (Donal Trump) राष्ट्राध्यक्ष असतानाच नाही तर आता निवडणूक हरल्यावर पायउतार झाल्यावरही चर्चेत आहेत. आता एक आगळंच कारण चर्चेसाठी समोर आलं आहे.

डोनाल्ड ट्रम्प (Donal Trump) राष्ट्राध्यक्ष असतानाच नाही तर आता निवडणूक हरल्यावर पायउतार झाल्यावरही चर्चेत आहेत. आता एक आगळंच कारण चर्चेसाठी समोर आलं आहे.

डोनाल्ड ट्रम्प (Donal Trump) राष्ट्राध्यक्ष असतानाच नाही तर आता निवडणूक हरल्यावर पायउतार झाल्यावरही चर्चेत आहेत. आता एक आगळंच कारण चर्चेसाठी समोर आलं आहे.

वॉशिंग्टन, 21 जानेवारी : व्हाइट हाऊस (white house) सोडल्यावर माजी राष्ट्राध्यक्ष (president) ट्रम्प आता नक्की कुठं रहायला जाणार याबद्दल खूप तर्कवितर्क लढवले जात आहेत. आता मात्र याबद्दलची अधिकृत माहिती समोर आली असून चर्चेवर पडदा पडला आहे.

डोनाल्ड ट्रम्प (Donald trump)आता त्यांच्या कुटुंबासह एका अत्यंत विस्तीर्ण आणि आलिशान जागी रहायला गेले आहेत. ही जागा फ्लोरिडा पाम बीच इथं आहे. बुधवारी ट्रम्प वॉशिंग्टन इथून निघत फ्लोरिडा पाम बीच इथं एका रिसॉर्टमध्ये (resort) रहायला गेले. मार-अ-लागो असं या रिसॉर्टचं नाव आहे. सध्या तरी ट्रम्प या रिसॉर्टमध्येच राहणार आहेत.

मार-अ-लागे ही फ्लोरिडामधील एक ऐतिहासिक जागा आहे. याची निर्मिती 1927 मध्ये झाली होती. या रिसॉर्टमध्ये तब्बल 126 खोल्या आहेत. या रिसॉर्टच्या एका भागात मार-अ-लागो क्लब आहे. यात सदस्यत्वाच्या (membership) आधारावर एंट्री मिळते. सध्यातरी माजी राष्ट्राध्यक्ष याच रिसॉर्टमध्ये राहणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी 1985 मध्ये मार-अ-लागो हा रिसॉर्ट जवळपास 73 करोड रुपयात खरेदी केला होता.

माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प बुधवारी बायडन (Jo Baden) यांच्या शपथग्रहणाआधी एअरफोर्स वन या आपल्या अधिकृत विमानाद्वारे फ्लोरिडा इथं पोचले. यादरम्यान ट्रम्पचं स्वागत करण्यासाठी शेकडो लोक रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उभे होते.

74 वर्ष वयाच्या डोनाल्ड ट्रम्प यांनी 2024 मध्ये पुन्हा निवडणूक (election) लढवण्याचे संकेत दिले आहेत. सध्या अमेरिकन संसदेवर झालेल्या हिंसक हल्ल्यासंदर्भानं (violent attack) ट्रम्प यांच्याविरूद्ध सिनेटमध्ये खटलाही सुरू आहे. या खटल्याचा निर्णय म्हणून ट्रम्प यांना पुढच्या वेळी निवडणूक लढवण्यापासून रोखलंही जाऊ शकतं.

First published:
top videos

    Tags: Donald Trump, Joe biden, President