नवी दिल्ली 13 नोव्हेंबर : अमेरिकेतून एक मोठी दुर्घटना समोर आली आहे. अमेरिकेच्या टेक्सास राज्यात एअर शोदरम्यान एक मोठा अपघात घडला. यात डलासमध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील दोन युद्ध विमाने हवेत एकमेकांवर आदळली. हा अपघात इतका भीषण होता की, टक्कर होताच एका विमानाचे मधूनच दोन तुकडे झाले. तर दुसरं विमान पूर्णपणे चक्काचूर झालं. या घटनेत पायलट आणि क्रू मेंबर्ससह 6 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन (FAA) नुसार, शनिवारी अमेरिकेतील डलास येथे या अपघातात दुसऱ्या महायुद्धात वापरले गेलेले विमान कोसळले आहेत. एअर शो पाहण्यासाठी याठिकाणी अनेक लोक पोहोचलेले होते. रशिया-युक्रेन युद्धात सैनिकाच्या छातीत घुसला बॉम्ब; पुढं जे घडलं ते चकित करणारं एअर शो सुरू असतानाच बोईंग बी-17 फ्लाइंग फोर्ट्रेस आणि बेल पी-63 किंगकोब्रा फाईटर या विमानांची जोरदार धडक झाली. डलास एक्झिक्युटिव्ह विमानतळाजवळ हा अपघात झाला. विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी ट्विटरवर सांगितलं की, आपत्कालीन कर्मचारी अपघातस्थळी पोहोचले. अपघातानंतर विमानातील क्रू मेंबर्सची चौकशी करण्यात येत आहे. दोन्ही विमानात किती लोक होते हे सध्या स्पष्ट झालेले नाही.
OMG - two planes collided at ‘Wings Over Dallas’ air show today
— James T. Yoder (@JamesYoder) November 12, 2022
This is crazy
pic.twitter.com/CNRCCnIXF0
दुसऱ्या महायुद्धातील लढाऊ विमानांच्या जतनासाठी समर्पित गट, Commissariat Air Force (CAF) चे अध्यक्ष आणि CEO हँक कोट्स म्हणाले की, B-17 मध्ये साधारणपणे चार ते पाच लोकांचा क्रू असतो. कोट्स म्हणाले की P-63 मध्ये फक्त एक पायलट असतो, परंतु अपघाताच्या वेळी विमानात इतर किती लोक होते हे त्यांनी सांगितलं नाही. जगावर आणखी एक महाभयंकर संकट! चीन-पाकिस्तान लॅबमध्ये बनवतोय कोरोनापेक्षाही खतरनाक व्हायरस? ही घटना व्हिडिओ क्लिपमध्ये कैद झाली आहे, ज्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यात दोन विमाने एकमेकांवर आदळली आणि आगीच्या भक्ष्यस्थानी येत जमिनीवर कोसळली. FAA आणि नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड (NTSB) यांनी घटनेचा तपास सुरू केला आहे.