मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

जगावर आणखी एक महाभयंकर संकट! चीन-पाकिस्तान लॅबमध्ये बनवतोय कोरोनापेक्षाही खतरनाक व्हायरस?

जगावर आणखी एक महाभयंकर संकट! चीन-पाकिस्तान लॅबमध्ये बनवतोय कोरोनापेक्षाही खतरनाक व्हायरस?

चीन-पाकिस्तानमुळे खतरनाक व्हायरसचं संकट

चीन-पाकिस्तानमुळे खतरनाक व्हायरसचं संकट

चीन आणि पाकिस्तान मिळून लॅबमध्ये कोरोनापेक्षाही खतरनाक आणि जीवघेणा व्हायरस तयार करत आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India
  • Published by:  Priya Lad

कराची, 10 नोव्हेंबर : जगावरील कोरोनाव्हायरसचं संकट अद्यापही टळलेलं नाही. वेगवेगळ्या आणि नव्या रूपात कोरोनाव्हायरस थैमान घालत आहेत. कोरोनाचे नवनवे व्हेरिएंट्स समोर येत आहेत. असं असताना जगावर आणखी एका व्हायरसचं संकट येतं की काय अशी भीती व्यक्त केली जाते आहे. याचं कारण म्हणजे ज्या चीनमधून कोरोनाचा उद्रेक झाला तोच चीन आता पाकिस्तानसह मिळून लॅबमध्ये कोरोनापेक्षाही खतरनाक आणि जीवघेणा व्हायरस तयार करतो आहे.

चीन आणि पाकिस्तान एकत्र मिळून बायोवेपेन तयार करत आहेत. पाकिस्तानातील रावलपिंडीतील एका रिसर्च लॅबमध्ये कोरोनापेक्षाही भयंकर व्हायरसची निर्मिती केली जात असल्याचा दावा केला जातो आहे.  एएनआयच्या रिपोर्टनुसार चीनमधील वुहान इन्स्टिट्युट ऑफ व्हायरोलॉजी आणि पाकिस्तानी आर्मीचं डिफेन्स सायन्स अँड टेक्नोलॉजी ऑर्गेनाइझेशन एका सिक्रेट लॅबमध्ये हा व्हायरस तयार करत आहे.

हे वाचा - एन्फ्लुएंझा, हंगामी ताप ठरू शकतात जीवघेणे, जाणून घ्या लक्षणं आणि उपचार

माहितीनुसार जिथं हा व्हायरस तयार केला जातो आहे ती लॅब BSL-4 आहे. या लॅबचा वापर अधिक संसर्गजन्य आणि विषारी, घातक व्हायरसचा अभ्यास करण्यासाठी केला जातो. जो जीवघेणे आजार पसरवू शकतो. ज्यावर कोणती लस नाही किंवा कोणता उपचार नाही.

चीनमधूनच आला होता कोरोनाव्हायरस

सध्या जगभर थैमान घालणारा कोरोनाव्हायरस चीनमधूनच आला होता. त्याचा मुख्य स्रोत अद्यापही समजलेला नाही. याबाबत बरेच दावे केले जात आहेत. काही तज्ज्ञांच्या मते हा व्हायरस वटवाघळातून आला. चीनच्या वुहानमधील मीट मार्केटमधून पसरला. तर काहींच्या मते वुहान लॅबमधून हा व्हायरस लीक झाला.

First published:

Tags: Health, Lifestyle, Pakistan, Virus, World news