मुंबई : भारतासह अनेक देशांमध्ये आता 5 दिवसांवरुन 4 दिवसांचा आठवडा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. काही कंपन्यांनी ४ दिवसांचा आठवडा प्रायोगिक तत्वावर सुरू देखील केला आहे. यातून येणारा रिझल्ट चांगला आहे. यामुळे कर्मचाऱ्यांचं काम तर सुधारलंच आहे त्यासोबत याचा पर्यावरणाला मोठा फायदा होत आहे. आता जगभरातून आठवड्यातून चार दिवस काम करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. याबाबत अनेक संशोधनं आणि प्रयोग सुरू आहेत. जपान, न्यूझीलंड, ब्रिटन, अमेरिका, आयर्लंड, स्पेन आणि आइसलँडमध्ये असे प्रयोग करण्यात आले आहेत. बहुतेक प्रयोगांमध्ये परिणाम चांगले दिसत आहेत. आठवड्यातून चार दिवस काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची उत्पादकता वाढण्यासोबतच त्यांच्या प्रकृतीतही सुधारणा दिसून येत आहे.
युट्युब कंटेंट क्रिएटर्सना मिळणार घसघशीत कमाई करण्याची संधी; कंपनीने बदलला ‘हा’ नियमआता काही संशोधनात असा दावा केला जात आहे की सर्व देशांमध्ये आठवड्यातून चार दिवस काम करण्याची प्रणाली लागू केल्यास कर्मचाऱ्यांच्या आरोग्याबरोबरच पृथ्वीच्या आरोग्यालाही फायदा होऊ शकतो.
प्रोफेसर जूलियेट शोअर यांनी याबाबत संशोधन करुन अहवाल सादर केला आहे. कामावर येणाऱ्यांची संख्या तीन दिवस नसेल याशिवाय लॅपटॉप, कम्प्युटर आणि इतर मशीनमुळे होणारं कार्बनडायऑक्साइड आणि उत्सर्जन हे कमी होईल असा दावा त्यांनी केला आहे. जवळपास 20 टक्के हे उत्सर्जन कमी होत असल्याची नोंद त्यांनी केली.
AC आणि कार प्रमाणे फ्रिजचीही रेग्यूलर सर्व्हिसिंग करणं गरजेचं? अवश्य जाणून घ्या ही माहिती2025 पर्यंत ब्रिटनमध्ये जर 4 डे विक लागू झालं तर 20 टक्के कार्बन उत्सर्जन कमी होईल असा दावा शोअर यांनी केला आहे. संशोधनात असे म्हटले आहे की, घरातून काम करण्याची व्यवस्था वाढवून, वाहतूक आणि वाहतूक कमी करून कार्बन उत्सर्जन कमी करता येऊ शकते. यूके, यूएस आणि आयर्लंडमधील 91 कंपन्या आणि 3,500 कर्मचाऱ्यांनी चार दिवसांच्या कामकाजाच्या आठवड्यात सहा महिन्यांच्या कालावधीत दोन चाचण्यांमध्ये भाग घेतला. लंडनस्थित फोर डे वीक ग्लोबल, ऑटोनॉमी थिंक टँक, केंब्रिज युनिव्हर्सिटी आणि बोस्टन कॉलेज यांनी या चाचणीचे निरीक्षण केले.