जाहिरात
मराठी बातम्या / मनी / युट्युब कंटेंट क्रिएटर्सना मिळणार घसघशीत कमाई करण्याची संधी; कंपनीने बदलला 'हा' नियम

युट्युब कंटेंट क्रिएटर्सना मिळणार घसघशीत कमाई करण्याची संधी; कंपनीने बदलला 'हा' नियम

यूट्यूब

यूट्यूब

गुगलच्या मालकीची व्हिडिओ प्लॅटफॉर्म कंपनी असलेल्या युट्यूबनं पेड क्रिएटर्सची किमान सब्सक्रायबर संख्या एक हजारवरून 500 पर्यंत कमी केली आहे.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 15 जून: मोठ-मोठ्या सेलिब्रिटींना एक इन्स्टाग्राम पोस्ट करण्यासाठी कोट्वधी रुपये मिळतात, याबाबद्दल तुम्ही ऐकलेलं असेल. म्हणजेच सोशल मीडियाच्या माध्यमातून सेलिब्रिटी पैसे कमवतात. सेलिब्रिटींप्रमाणे सामान्य नागरिकही घरबसल्या अशा प्रकारे पैसे कमवू शकतात. यासाठी तुम्हाला युट्यूब या व्हिडिओ प्लॅटफॉर्मची मदत होईल. या ठिकाणी फक्त व्हिडिओ अपलोड करून पैसे मिळवता येतात. युट्यूबनं गेल्या तीन वर्षांत क्रिएटर्स, आर्टिस्ट आणि मीडिया संस्थांना जवळपास 30 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त रक्कम दिली आहे. ज्या क्रिएटर्सचे एक हजारपेक्षा जास्त सब्सक्रायबर्स आहेत त्यांना युट्यूबकडून पैसे दिले जातात. आता कंपनीनं ही सब्सक्रायबर मर्यादा कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘इंडिया टुडे’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

    News18लोकमत
    News18लोकमत

    गुगलच्या मालकीची व्हिडिओ प्लॅटफॉर्म कंपनी असलेल्या युट्यूबनं पेड क्रिएटर्सची किमान सब्सक्रायबर संख्या एक हजारवरून 500 पर्यंत कमी केली आहे. प्लॅटफॉर्मवर लहान क्रिएटर्सचा अधिक संधी देण्यासाठी कंपनी आपल्या आर्थिक धोरणांमध्ये मोठे बदल करत आहे. कंपनीनं घोषणा केली आहे की, युट्यूब पार्टनर प्रोगॅमसाठीची सब्सक्रायबर पात्रता कमी करत आहे आणि कमी फॉलोअर्स असलेल्या क्रिएटर्ससाठी उपलब्ध कमाई पद्धतींची श्रेणी विस्तारत आहे. पूर्वी, क्रिएटर्सना युट्युब पार्टनर प्रोग्रॅममध्ये सहभागी होण्यासाठी आणि कंटेटच्या माध्यमातून कमाई करण्यासाठी काही निकष पूर्ण करावे लागत होते. आता जाहीर करण्यात आलेल्या नवीन धोरणांतर्गत, क्रिएटर्सना या प्रोग्रॅमसाठी पात्र होण्यासाठी केवळ 500 सब्सक्रायबर असणं आवश्यक आहे. त्यासोबतच वॉच अवर्सचा निकष चार हजार तासांहून तीन हजार तास करण्यात आला आहे. तर शॉर्ट्स व्ह्यूजचं लिमिट 10 दशलक्षांवरून 3 दशलक्ष करण्यात आली आहे. हे अपडेट्स सुरुवातीला युनायटेड स्टेट्स, युनायटेड किंग्डम, कॅनडा, तैवान आणि दक्षिण कोरियामध्ये लागू केले जातील.

    IRCTC: फिरायला जायचा प्लान करताय? मग स्वस्तात करा बालीची सैर, IRCTC ने आणलंय खास पॅकेज

    लहान कंटेंट क्रिएटर्सना आता युट्युबच्या माध्यमातून कमाई करण्याच्या अधिक संधी असतील. तरीही त्यांनी त्यांची प्रेक्षक संख्या वाढवणं आणि जाहिरात महसूल मिळविण्यासाठी विशिष्ट बेंचमार्क पूर्ण करणं गरजेचं आहे. कमाईच्या वाटणीसाठी सध्याचे निकष ‘जैसे थे’ राहतील. पण, जे क्रिएटर्स अगोदर युट्युब पार्टनर प्रोग्रॅमसाठी पात्र आहेत त्यांनी हायर लिमिट पूर्ण केल्यावर त्यांना पुन्हा अर्ज करण्याची गरज भासणार नाही. एकूणच कंपनीच्या नवीन आर्थिक धोरणाचा कंटेंट क्रिएटर्सना फायदा होणार आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात