एअर कंडिशनर किंवा कार प्रमाणे, रेफ्रिजरेटर्सना रेग्यूलर सर्व्हिसिंगची गरज नसते. फ्रीज एफिशिएंटली रन करण्यासाठी आपल्याला वेळोवेळी काही टास्क करायचे असतात.
क्लीनिंग: रेफ्रिजरेटरला दुर्गंधी आणि घाणीपासून वाचवण्यासाठी ते वेळोवेळी स्वच्छ केले पाहिजे. फ्रीजचे सर्व शेल्फ आणि दरवाजे स्वच्छ करावेत. पण यासाठी कोणतंही हार्ड केमिकल वापरू नका.
डीफ्रॉस्टिंग: जर तुमच्याकडे मॅन्युअल डीफ्रॉस्ट फ्रीज असेल तर ते वेळोवेळी डीफ्रॉस्ट करणे आवश्यक आहे. बर्फ जमा झाल्यामुळे कूलिंगची कार्यक्षमता कमी होते.
कंडेन्सर कॉइल कूलिंग: फ्रीजच्या मागील किंवा तळाशी असलेल्या कंडेन्सर कॉइल कालांतराने धूळ जमा करतात. ही साचलेली घाण रेफ्रिजरेटरच्या कूलिंग कॅपेसिटीवर परिणाम करू शकते. अशावेळी व्हॅक्यूम क्लिनरच्या मदतीने कॉइल साफ करावी.
डोर सील: दरवाजा सील किंवा गास्केट स्वच्छ आहे हे कंफर्म करण्यासाठी ते नियमित चेक करा. सील तुटल्यास किंवा खराब झाल्यास हे बदलून घ्यावेत. कारण, त्यांचा कूलिंगवर परिणाम होतो. यासोबतच योग्य तापमानाचीही काळजी घेतली पाहिजे.
वरील उपायांनी रेफ्रिजरेटर सहजपणे दीर्घकाळ चालवता येतो. आपल्याला कोणतीही टेक्निकल प्रॉब्लम दिसल्यास तुम्ही प्रोफेशनल सल्ला देखील घेऊ शकता. तसंतर आजच्या मॉडर्न रेफ्रिजरेटरला कमी मेंटेनेंसची गरज असते.