जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / UN Election: ....तर राष्ट्रसंघाची सरचिटणीस होऊन इतिहास घडवू शकते आकांक्षा अरोरा; कोण आहे ही महत्त्वाकांक्षी तरुणी?

UN Election: ....तर राष्ट्रसंघाची सरचिटणीस होऊन इतिहास घडवू शकते आकांक्षा अरोरा; कोण आहे ही महत्त्वाकांक्षी तरुणी?

UN Election: ....तर राष्ट्रसंघाची सरचिटणीस होऊन इतिहास घडवू शकते आकांक्षा अरोरा; कोण आहे ही महत्त्वाकांक्षी तरुणी?

UN Secretary General Elections: सर्वोच्च जागतिक संस्था संयुक्त राष्ट्रसंघाच्या (UNO) सरचिटणीसपदासाठी अनुभव नसतानाही आकांक्षा अरोरा ही 34 वर्षीय भारतीय-अमेरिक निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे आणि सध्याचे विद्यमान सरचिटणीस अँटोनियो (Antonio Guterres) यांच्यावर थेट आरोप करत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, ३ मार्च :  सध्या संयुक्त राष्ट्र संघाच्या (United Nations Secretary General) निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्यात आकांक्षा अरोरा ( Akanksha Arora) हे नाव चर्चेत आहे. या निवडणुकीत (Election) जर आकांक्षा यांचे दावे, प्रतिदावे प्रभावी ठरले तर संयुक्त राष्ट्र संघाच्या 75 वर्षांच्या इतिहासात प्रथमच एक महिला या सर्वोच्च जागतिक संस्थेच्या सरचिटणीस (Secretary General of UN) पदावर आरुढ होऊ शकते. सध्या या पदावर अँटोनियो गुटेरेस (Antonio Guterres) कार्यरत आहेत. येत्या निवडणुकीत त्यांच्या विरोधात भारतीय अमेरिकी (Indian American) आकांक्षा अरोरा (Akanksha Arora UN election) या एकमेव भारतीय अमेरिकी उमेदवार रिंगणात आहेत. 34 वर्षीय आकांक्षा या युवकांची प्रतिनिधी असं सांगत निवडणूक लढवत असून, आपल्या आगामी योजना आणि हेतू आक्रमकपणे मांडत आहेत. आकांक्षा यांच्या उमेदवारीला अद्यापही राष्ट्रीय पाठिंबा मिळालेला नसला तरी त्यांनी संयुक्त राष्ट्र विकासासाठी आणि चांगल्या उदिदष्टांसाठी बदल महत्वपूर्ण असल्याचे सांगत 9 फेब्रुवारीपासून सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून जोरदार प्रचार मोहिम सुरू केलीय. विद्यमान सरचिटणीस अँटोनियो यांचा कार्यकाळ अनेक महत्त्वाच्या आघाड्यांवर अपयशी ठरला असल्याचे सांगत आकांक्षा यांनी संघटनेचे नेतृत्व बदलण्याची गरज असल्याचे नमूद केलं आहे. आकांक्षा अरोडा कोण आहेत**?**  भारतातील हरियाणा इथे आकांक्षा यांचा जन्म झाला. त्या 6 वर्षांच्या असताना त्यांचं कुटुंब सौदी अरब येथे स्थलांतरित झालं. त्यानंतर आकांक्षा यांनी कॅनडातील टोरांटो येथील यॉर्क युनिव्हर्सिटीतून पदवी मिळवली. तसंच कोलंबिया विद्यापीठातून (Columbia University) लोकप्रशासनात पदव्युत्तर पदवी मिळवली. आकांक्षा यांच्याकडे भारताचे ओवरसिज नागरिकत्व आणि कॅनडाचा पासपोर्ट आहे. परंतु, त्यांनी आपल्या उमेदवारीच्या अनुषंगाने कोणत्याही देशाकडे औपचारिक पाठिंबा मागितलेला नाही.

null

सध्या त्या संयुक्त राष्ट्राच्या विकास कार्यक्रमात म्हणजेच यूडीएनपीमध्ये (UNDP) ऑडिट को-आर्डिनेटर या पदावर कार्यरत आहेत. या माध्यमातून त्या अंतर्गत आणि बाह्य व्यवहार व्यवस्थापनाचे लेखापरीक्षण पाहतात. UN संस्थेत अर्थिक सुधारणा आणि नियम सुधारण्यासाठी त्यांची नेमणूक करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. प्रचार मोहिम कशी सुरू आहे**?** दोन वर्षांपासून मी युएनमधील सुधारणांसाठी काम करीत आहे. वरिष्ठ नेतृत्वापर्यंत माझी पोहोच असल्याचे आकांक्षा यांनी सांगितले. पण त्यांचा अनुभव असा होता की संबंधितांना या संस्थेत कोणतीही सुधारणा नकोय, तसेच कोणत्याही प्रकारची जोखीम घेण्याची तयारी नाही. बदलाची भिती वाटत असल्याचा आरोप करीत आकांक्षा यांनी अँटोनियो यांना तीव्र विरोध सुरु केला आहे. यूएन त्याच्या उदिदष्टांपासून विचलित झाल्याचा आरोप त्यांनी केलाय. सोशल मिडीयावर एक व्हिडीओ प्रसिध्द करत त्यांनी यूएनच्या सद्यस्थिती आणि परिस्थितीवर जोरदार टिका केली आहे. तसेच मी माझ्या निवडणुकीचा प्रचार (Election Campaign) स्वखर्चाने करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केलय.

null

अनुभव फॅक्टर काय आहे**?** जागतिक स्तरावरील संस्थेच्या सर्वोच्च पदावर 34 वर्षीय महिलेनी दावा केला असला तरीही त्यांना अनुभव किती आहे असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागलाय. विदेशी आणि शासकीय कामकाजाचा अनुभव नसला तरी माझे वय हा माझा प्लस पॉईंट असल्याचं आकांक्षा सांगतात. जगातील एकूण लोकसंख्येपैकी निम्मी लोकसंख्या ही 30 वर्षांपेक्षा कमी वयाची आहे, त्यामुळे युवकांना प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे असा दावा त्यांनी केलाय. युवकांच्या समस्यांची मला चांगली जाण आहे. बदल करण्यासाठी युवकांमध्ये प्रेरणा आणि जिद्द आहे, असे त्या म्हणतात. #UNTHATWORKS यासह त्यांनी सोशल मिडीयावर आपले UNOW हे कॅंपेन सुरु केलय. जर मी या पदासाठी निवडून आले तर जगाच्या अपेक्षेनुसार युएनला ही संस्था बनवण्याचा दावा त्यांनी केला आहे. अवश्य वाचा -  Corona Vaccination: मोदींव्यतिरिक्त कोणत्या देशांच्या नेत्यांनी घेतली लस? चीनच्या अध्यक्षांनी नाही घेतलं Vaccine

जाहिरात

अजून खास बाबी कोणत्या**?** 2006मध्ये काँग्रेस नेते शशि थरुर यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसपदासाठी आपली उमेदवारी घोषित केली होती तेव्हा कोणत्याही भारतीयाने असे पाऊल उचलण्याची ती शेवटची वेळ होती. 15 वर्षांनंतर असा दावा करणाऱ्या आकांक्षाविषयी एक विशेष गोष्ट म्हणजे त्या जगभरातील निर्वासितांबाबत वारंवार चर्चा करतात.

कदाचित यामागे त्यांचे आजोबा, आजी आणि त्यांची पिढी 1947 मधील फाळणीच्या शोकांतिकेची बळी ठरली होती आणि त्यानंतर त्यांच्या कुटुंबाला भारतात शरणार्थी संबोधले गेल्याचे कारण असू शकते. आकांक्षा यांचे पालक वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. वयाच्या 9 ते 18 वर्षांदरम्यान आकांक्षा यांनी भारतातील बोर्डिंग स्कूलमध्ये शिक्षण घेतलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात