काठमांडू 27 मार्च : एअर इंडिया आणि नेपाळ एअरलाइन्सची विमानं शुक्रवारी नेपाळमध्ये हवेतच भिडणार होती. मात्र, तेव्हाच वॉर्निंग सिस्टमने वैमानिकांना सतर्क केलं आणि त्यांच्या त्वरित कारवाईमुळे मोठा अपघात टळला. अधिकाऱ्यांनी रविवारी ही माहिती दिली. यानंतर नेपाळच्या नागरी उड्डाण प्राधिकरणाने (CAAN) हवाई वाहतूक नियंत्रण विभागाच्या तीन कर्मचाऱ्यांना निष्काळजीपणाच्या आरोपावरून निलंबित केलं आहे. CAAN चे प्रवक्ते जगन्नाथ निरुला यांनी ही माहिती दिली. प्रवाशांकडून 1 कोटी वसूल करून महिलेनं बनवला रेकॉर्ड; रेल्वे तिकीट चेकरचं मंत्रालयानंही केलं कौतुक शुक्रवारी सकाळी मलेशियाच्या क्वालालंपूर येथून काठमांडूला येणारं नेपाळ एअरलाइन्सचं एअरबस ए-320 विमान आणि नवी दिल्लीहून काठमांडूला येणारं एअर इंडियाचं विमान यांची टक्कर होणार होती. एअर इंडियाचं विमान 19,000 फूट उंचीवरून खाली येत होतं, तर नेपाळ एअरलाइन्सचं विमान त्याचवेळी 15,000 फूट उंचीवरून उडत होतं, असं निरुला यांनी सांगितलं.
Air Traffic Controllers (ATCs) of Tribhuvan International Airport involved in traffic conflict incident (between Air India and Nepal Airlines on 24th March 2023) have been removed from active control position until further notice. pic.twitter.com/enxd0WrteZ
— Civil Aviation Authority of Nepal (@hello_CAANepal) March 26, 2023
प्रवक्त्याने सांगितलं की, रडारवर दोन विमानं परिसरात असल्याचं दाखविल्यानंतर नेपाळ एअरलाइन्सचं विमान खाली उतरून सात हजार फूट उंचीवर आलं.
नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाने या प्रकरणाच्या चौकशीसाठी तीन सदस्यीय समिती स्थापन केली आहे. घटनेच्या वेळी नियंत्रण कक्षात तैनात असलेल्या तीन अधिकाऱ्यांना CAAN ने निलंबित केलं. सध्या या घटनेवर एअर इंडियाकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. ही घटना 24 मार्च रोजी घडली आहे. Civil Aviation Authority of Nepal च्या ट्विटर हँडलवरुन रविवारी रात्री उशिरा याबाबतची माहिती देण्यात आली. सुदैवाने वॉर्निंग सिस्टममुळे अपघात टळला. अन्यथा मोठी दुर्घटना होण्याची शक्यता होती.