मुंबई 17 जुलै: वीज पडून (Lightning) जखमी होणं किंवा मृत्यू होणं अशा दुर्दैवी घटना आपण नेहमीच बघतो. पावसाळ्यात (Rainy Season) अशा दुर्दैवी घटनांमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. अशा घटना टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी याबाबत अनेक तज्ज्ञ वारंवार मार्गदर्शन करत असतात. मात्र तरी देखील या घटना घडतच असतात. नुकतीच इंग्लंडमध्ये घडलेली अशीच एक घटना जोरदार चर्चेत आहे. पावसात सेल्फी घेण्याच्या नादात एका झाडाखाली थांबलेल्या तीन सख्ख्या बहिण-भावंडांच्या अंगावर वीज पडली. यात हे तिघे जण किरकोळ जखमी झाले. या तिघांपैकी एक मुलीची काही वर्षांपुर्वी हाताची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यावेळी हातामध्ये टिटॅनियमची (Titanium) प्लेट बसवण्यात आली होती. या धातूकडे आकर्षित होऊन वीज पडली असावी, असा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. जाणून घेऊया संपूर्ण घटनाक्रम...
वादळी पावसात सेल्फी घेणं इंग्लंडमधील (England) बहिण भावंडांना भलतचं महागात पडलं. झाडाजवळ उभे राहून सेल्फी घेत असताना अंगावर वीज पडून हे तिघे जागेवरच बेशुध्द पडले. शुध्दीवर आले तेव्हा हे तिघेही रुग्णालयात दाखल होते. ही घटना इंग्लंडमधील ईस्ट मोल्सी (East Molesey) परिसरात घडली. त्या दिवशी ईस्ट मोल्सी परिसरात जोरदार वादळी पाऊस पडत होता. आम्ही तिघे आमच्या मावशीला भेटण्यासाठी सायकलवरुन निघालो. काही अंतर गेल्यावर जोरदार विजा कडाडू लागल्या. पाऊसही जोरदार कोसळत होता. त्यातच वीज पडून आम्ही तिघेही जखमी झाल्याचं रिचेल, इसाबेला आणि अँड्र्यु यांनी बीबीसीला सांगितलं.
गर्भपाताचं रॅकेट चालविणाऱ्या चौघींचा भयावह VIDEO; उघड्यावर सुरू होता अवैध प्रकार
यातील एका पीडित मुलीनं सांगितलं की, मला लघुशंका करायची असल्यानं आम्ही सायकल रस्त्याच्या कडेला लावल्या आणि एका झाडाचा आसरा घेतला. यावेळी मी एक सेल्फीही (Selfie) घेतला. आम्ही भर पावसात अजून फोटो काढू इच्छित होतो, असे 23 वर्षीय इसाबेलाने सांगितले. आम्ही झाडाखाली थांबलो असता, जोरदार आवाज झाला आणि मी खाली कोसळले. या आवाजाशिवाय मला अन्य काहीच ऐकू आले नाही आणि मी जखमी झाले. राचेलने याने सांगितले की माझा जांघेचा आणि पोटाचा भाग भाजले आहेत. हाताला जखम झाली. या घटनेमुळे आम्ही पुरते गोंधळून गेलो. नक्की काय झाले हे आम्हाला क्षणभर कळेना. आम्ही बहिण-भाऊ रस्त्यावर जोरजोरात ओरडत होतो. अंगावर वीज पडल्याचे आमच्या लक्षात आले. त्यानंतर आम्ही बेशुध्द पडलो. आम्ही शुध्दीवर आलो तेव्हा रुग्णालयात भरती होतो. अहवालानुसार, या तिघांना टुटींग येथील सेंट जॉर्ज रुग्णालयात भरती करण्यात आले. उपचारांनंतर या तिघांना घरी सोडून देण्यात आले, असे आज तकने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.
कुत्र्यांसमोर नाचणाऱ्या 'बसंती'चा डान्स सुपरहिट; इंटरनेटवर तुफान व्हायरल होतोय VIDEO
मागील वर्षी सायकलवरुन पडल्याने इसोबेलाच्या हाताला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर तिच्या हातावर शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेवेळी तिच्या हातात टिटॅनियमची प्लेट बसवण्यात आली होती. या टिटॅनियमच्या प्लेटकडे आकर्षित होऊन वीज अंगावर पडली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात आला. वीज पडल्यानंतर माझ्या बहिणीचा हात अत्यंत गरम लागत होता. आमच्यासोबत ही घटना घडल्याने सर्वांनी आश्चर्य व्यक्त केल्याचे राचेलने सांगितले. किंबहुना त्यामुळेच वीज पडल्याची ही घटना अन्य घटनांच्या तुलनेत अधिक चर्चेत आली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Shocking news, Social media viral