श्रीनगर, 07 ऑक्टोबर: मंगळवारी जम्मू -काश्मीरमध्ये (Jammu-Kashmir) दोन तासांच्या आत तीन दहशतवादी (Terror Incident) घटना घडल्या. या घटनांमध्ये तीन जणांवर गोळीबार करण्यात आला. दरम्यान आज पुन्हा एकदा जम्मू -काश्मीरची राजधानी श्रीनगरमधील ईदगाह परिसरात दहशतवादी हल्ला झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ईदगाह परिसरातील एका शाळेत दहशतवाद्यांनी गोळीबार केला आहे. जम्मू -काश्मीर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात दोन शिक्षकांचा मृत्यू झाला आहे.
श्रीनगरमधील सफा कदल भागात गुरुवारी अज्ञात बंदुकधाऱ्यांनी एका शाळेत घुसून मुख्याध्यापकाची आणि एका महिला शिक्षिकेची गोळ्या घालून हत्या केली.
Two teachers killed in a terrorist attack at a government school in the Iddgah Sangam area of Srinagar: Jammu and Kashmir Police
— ANI (@ANI) October 7, 2021
समोर आलेल्या माहितीनुसार, दहशतवादी असल्याचा संशय असलेल्या बंदूकधाऱ्यांनी येथील अलोचीबाग येथील रहिवासी सतींदर कौर आणि दीपक कौर या दोघांवर सफा कडल येथे गोळीबार केला आणि ते गंभीर जखमी झाले.
हेही वाचा- आर्यन खानसोबत दिसलेल्या BJP नेत्याचं स्पष्टीकरण, सांगितलं...
घटनेनंतर दोघांनाही SKIMS रुग्णालयात हलवण्यात आलं. जेथे त्यांना दाखल केल्यानंतर मृत घोषित करण्यात आलं, असे अधिकाऱ्यांनी जीएनएसला सांगितले. या घटनांमुळे जम्मू काश्मीरमध्ये दहशतीचे वातावरण आहे.
मंगळवारी तीन घटनेत तिघांची हत्या
पहिली घटना श्रीनगरमधील (Srinagar)इक्बाल पार्कजवळ घडली. ज्यात काश्मिरी पंडित समुदाय आणि बिंदरू मेडिकेटचे मालक माखन लाल बिंदरू यांच्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार करुन त्यांची हत्या केली. त्याचवेळी, श्रीनगरच्या बाहेरील हवल येथील मदीन साहिबजवळ आणखी एक घटना घडली, ज्यात दहशतवाद्यांनी रस्त्यावरील फेरीवाल्याला गोळ्या घातल्या. तिसरी घटना उत्तर काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यातील हाजीन भागात घडली ज्यात अज्ञात बंदुकधाऱ्यांनी एका मोहम्मद शफी नावाच्या व्यक्तीवर गोळ्या झाडल्या. ज्यात त्याचा मृत्यू झाला आहे.
हेही वाचा- गणपती बाप्पा मोरया, आजपासून 'श्री गणेशा'; 'सिद्धिविनायका'च्या दर्शनाची नियमावली
उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनीही या घटनांवर शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, मी भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करतो. दहशतवादी त्यांच्या नापाक योजनांमध्ये कधीही यशस्वी होणार नाहीत आणि अशा कृत्यांना जबाबदार असणाऱ्यांना न्याय मिळवून दिला जाईल. त्याचवेळी माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला म्हणाले की, या दुःखाच्या परिस्थितीत मी कुटुंबासोबत आहे. ही दु: खद बातमी आहे, बिंदरू यांच्या कुटुंबासाठी माझी संवेदना. माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या की, मी या हत्येचा निषेध करते, अशा हिंसक घटनांना समाजात स्थान नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.