मॉस्को, 16 जुलै: जगातील अनेक देशांमध्ये पुरातन संस्कृतीचा (Ancient culture) शोध घेण्यासाठी उत्खनन (Excavation) करण्यात येतं. पुरून ठेवलेल्या काही गोष्टींचे संदर्भ शोधणे, जुन्या संस्कृतींचे अवशेष शोधणे किंवा इतिहासातील घटना तपासून पाहणे अशा वेगवेगळ्या कारणांसाठी उत्खनन करण्यात येतं. रशियात (Russia) सुरु असलेल्या उत्खननातून एकाच जागी तब्बल 20 हजार सांगाडे (20 thousand bodies) आढळून आली आहेत. यामुळे केवळ रशियातच नव्हे, तर जगभरात खळबळ उडाली आहे.
नेमकं काय घडलं?
रशियात दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ज्या जागी प्रचंड नरसंहार झाला, त्या पश्चिम भागात काही शिक्षकांनी हे उत्खनन सुरू केलं होतं. या भागावर काही वर्षांपूर्वी नाझींचा ताबा होता आणि त्यांनी मोठं घबाड जमिनीत पुरून ठेवल्याची चर्चा वर्षानुवर्ष या भागात रंगत होती. त्याचप्रमाणं या भागाला रक्तरंजित इतिहासदेखील असल्याच्या कहाण्या रंगवून रंगवून सांगितल्या जातात. या भागात उत्खनन करताना काही हाडं आढळून आली आणि त्यानंतर बघता बघता 20 हजार सांगाडे उत्खननातून बाहेर आले.
नाझींनी केले हत्याकांड
नाझींनी दुसऱ्या महायुद्धाच्या काळात या भागात हजारो नागरिकांची हत्या केल्याची नोंद इतिहासात आहे. या सांगाड्यांच्या प्राथमिक पाहणीत बऱ्याचशा सांगाड्यांस्ना गोळ्या लागल्याच्या खुणा आहेत. म्हणजेच निःशस्त्र नागरिकांना गोळ्या घालून ठार मारण्यात आलं आणि त्यांचे मृतदेह या ठिकाणी पुरून ठेवण्यात आले, या इतिहासाला या घटनेनं दुजोरा मिळाला आहे.
हे वाचा - मोठी बातमी: तब्बल 4 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचे निकाल राखीव, हे आहे कारण
परिसरात रंगली चर्चा
आपल्या परिसरात 20 हजार सांगाडे बाहेर आल्याचं समजल्यानंतर स्थानिक नागरिकांमध्ये एकच गोंधळ उडाला. वास्तविक, या भागात नाझींनी मोठा खजिना पुरून ठेवल्याची आख्यायिका गावात अनेक वर्षं चर्चिली जात होती. उत्खनन करणाऱ्यांनादेखील खजिना सापडेल, अशी अपेक्षा सापडेल अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात एवढ्या प्रचंड प्रमाणात आढळलेले सांगाडे पाहून सर्वांनाच धक्का बसला. या सांगाड्यांवर सध्या संशोधन सुरू असून त्यातून इतिहासाचे आणखी काही पदर उलगडण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.