मराठी बातम्या /बातम्या /विदेश /Shocking! फोटोशूट करण्यात व्यग्र होती आई; हलगर्जीपणामुळे 2 वर्षाचा बाळाचा मृत्यू

Shocking! फोटोशूट करण्यात व्यग्र होती आई; हलगर्जीपणामुळे 2 वर्षाचा बाळाचा मृत्यू

Shocking news: 2 वर्षाचा एक मुलगा खेळता-खेळता स्विमिंग पुलमध्ये बुडाला (2 Year Old Baby Drowned in Swimming Pool). ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा बाळाचे पालक पुलाच्या समोर उभा राहूनच फोटोशूट करत होते

Shocking news: 2 वर्षाचा एक मुलगा खेळता-खेळता स्विमिंग पुलमध्ये बुडाला (2 Year Old Baby Drowned in Swimming Pool). ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा बाळाचे पालक पुलाच्या समोर उभा राहूनच फोटोशूट करत होते

Shocking news: 2 वर्षाचा एक मुलगा खेळता-खेळता स्विमिंग पुलमध्ये बुडाला (2 Year Old Baby Drowned in Swimming Pool). ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा बाळाचे पालक पुलाच्या समोर उभा राहूनच फोटोशूट करत होते

नवी दिल्ली 16 फेब्रुवारी: आयुष्यात जेव्हा बाळ येतं तेव्हा माणसाच्या जबाबदाऱ्या वाढतात. प्राथमिकता बदलतात. तुम्ही काहीही करत असला तरी तुमचं पूर्ण लक्ष आपल्या बाळाकडेच असतं. हे बाळ अगदी कमी काळातच आपल्या आयुष्यातील महत्त्वाचं स्थान घेतं. लहान मुलांना बऱ्याच गोष्टींची समज नसते, त्यामुळे पालकांनाच त्यांच्याकडे लक्ष द्यावं लागतं आणि त्यांची काळजी घ्यावी लागते. मात्र, यात एखादी व्यक्ती कमी पडली तर नक्कीच आयुष्यभर तिला याचा पश्चाताप राहील.

कर्ज वसुलीसाठी कंपनीचं घृणास्पद कृत्य; अश्लील फोटो VIRAL होताच तरुणानं दिला जीव

थायलंडमधून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 2 वर्षाचा एक मुलगा खेळता-खेळता स्विमिंग पुलमध्ये बुडाला (2 Year Old Baby Drowned in Swimming Pool). ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा बाळाचे पालक पुलाच्या समोर उभा राहूनच फोटोशूट करत होते आणि मागे मुलगा हळूहळू खोल पाण्यात गेला. अॅडल्ट साईट Onlyfans ची मॉडेल वियाडा पोंटावी (Adult Model) हिला आता आपलं मुल परत मिळवायचं आहे. मुलाच्या मृत्यूमुळे तिला मोठा धक्का बसला आहे.

2 वर्षाचा चवनकोन आपल्या घरातील पुलमध्ये खेळत होता. पालकांचे मॉडेल फ्रेंड्स आपल्याच मस्तीत मग्न होते. पालकही फोटोशूटमध्ये व्यग्र होते आणि बाळ स्विमिंग पुलमध्ये खेळत होतं. तिथे कोणाचंच त्याच्याकडे लक्ष नव्हतं. त्याच्या घशातही पाणी शिरल्याने हे बाळ ओरडूही शकत नव्हतं. अचानक त्याच्या आई-वडिलांना काहीतरी वेगळा आवाज येत असल्याचं जाणवलं. मागे वळून पाहताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांचा मुलगा पाण्यात बुडाला होता. लगेचच त्याला बाहेर काढून CPR देण्यास सुरुवात केली गेली. रुग्णालयातही नेण्यात आलं. मात्र त्याचा जीव वाचला नाही.

शिक्षिकेनं विद्यार्थ्यांच्या कपकेकमध्ये टाकली किळसवाणी गोष्ट, 41 वर्ष तुरुंगवास

26 वर्षीय वियाडा पोंटावी अॅडल्ट साईट Onlyfans ची मॉडेल आहे आणि तिचा पती फोटोग्राफर आहे. त्यादिवशी घरात व्हॅलेंटाईन डेची पार्टी होती. त्यामुळे घरात अनेक पाहुणे होते. या पार्टीचा उद्देश साईटसाठी फोटोशूट करणं हादेखील होता. या पार्टीत अनेक अॅडल्ट मॉडेल फ्रेंड्सही होते. ज्यामुळे हे बाळ पुलात बुडलं तेव्हा त्याची आई पुलाच्या समोरच फोटोशूट करत होती. आता तिची रडून रडून अवस्था वाईट झाली आहे.

First published:
top videos

    Tags: Baby died, International, Photoshoot, Shocking news, Small baby