जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / शिक्षिकेचं धक्कादायक कृत्य; विद्यार्थ्यांसाठीच्या कपकेकमध्ये टाकली किळसवाणी गोष्ट, झाली 41 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा

शिक्षिकेचं धक्कादायक कृत्य; विद्यार्थ्यांसाठीच्या कपकेकमध्ये टाकली किळसवाणी गोष्ट, झाली 41 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा

शिक्षिकेचं धक्कादायक कृत्य; विद्यार्थ्यांसाठीच्या कपकेकमध्ये टाकली किळसवाणी गोष्ट, झाली 41 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा

घाणेरड्या मानसिकतेच्या या शिक्षिकेनं कपकेकमध्ये आपल्या पूर्व पतीचे स्पर्म मिसळून मुलांना ते खाण्यासाठी दिलं (Teacher Mixed Husband’s Sperm in Cupcake of Students).

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 16 फेब्रुवारी : जगात अनेक घाणेरड्या मानसिकतेचे लोक पाहायला मिळतात. हे लोक आपल्या वेडेपणात इतके आंधळे होतात की त्यांना चूक-बरोबर, चांगलं-वाईट यातला फरकही दिसणं बंद होतं. अशा लोकांना कडक शिक्षा देऊनच अद्दल घडवता येते. नुकतंच अमेरिकेतील एका महिलेनेही असंच कृत्य केलं, जे सर्वांना हादरवणारं होतं. 1 वर्षाच्या मुलीसोबत वडिलांचं धक्कादायक कृत्य, आई व्हिडिओ बनवत राहिली डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, लूसियानाची एक माजी स्कूल टीचर सिंथिया पर्किंन्सने असा गुन्हा केला, ज्याबद्दल ऐकूनच कोणीही हैराण होईल. महिला एका शाळेत शिक्षिका होती. या शाळेतील मुलांना कपकेक वाटले गेले, मात्र घाणेरड्या मानसिकतेच्या या शिक्षिकेनं कपकेकमध्ये आपल्या पूर्व पतीचे स्पर्म मिसळून मुलांना ते खाण्यासाठी दिलं (Teacher Mixed Husband’s Sperm in Cupcake of Students). या प्रकरणानंतर साल 2019 मध्ये तिला अटक करण्यात आली. सगळ्यात हैराण करणारी बाब म्हणजे महिलेच्या या गुन्ह्यात तिचा पूर्व पती डेनिसनेही तिची साथ दिली, तो एक पोलीस अधिकारी होता. दोघांनाही पोलिसांनी अटक केली आणि प्रकरण कोर्टात पोहोचल्यानंतर सिंथियाने आपण निर्दोष असल्याचं म्हटलं. मात्र नंतर तिने कोर्टात मान्य केलं की या गुन्ह्यासोबतच तिने लैंगिक शोषणाचे गुन्हेही केले आहेत. चाईल्ड पॉर्नोग्राफी आणि बलात्कारासारख्या गुन्ह्यांमध्येही आपला सहभाग असल्याचं तिने मान्य केलं.

प्यार हमे किस मोड पे ले आया; प्रेयसीच्या मागण्यांमुळे तरुण पोहोचला तुरुंगात

वेस्टसाईट ज्युनिअर हायस्कूलमध्ये शिकवणाऱ्या शिक्षिकेने मान्य केलं की तिने मुलांना दिल्या जाणाऱ्या अनेक पेस्ट्रीमध्ये पतीचे स्पर्म टाकले होते. सोमवारी कोर्टात ज्यूरीसमोर तिला हजर केलं जाणार होतं, मात्र त्याआधीच तिने आपला गुन्हा मान्य केला. आता पुढच्या सुनावणीत ती यात आपला पूर्व पतीही सहभागी असल्याचं सांगणार आहे. महिलेला 72 वर्षाची शिक्षा होणार होती, मात्र आता तिची शिक्षा कमी करून 41 वर्ष करण्यात आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात