Home /News /videsh /

या हॉस्पिटलच्या 11 नर्स एकाचवेळी राहिल्या प्रेग्नंट; दोघींची तर डिलिव्हरी डेट पण आहे सेम

या हॉस्पिटलच्या 11 नर्स एकाचवेळी राहिल्या प्रेग्नंट; दोघींची तर डिलिव्हरी डेट पण आहे सेम

अनेक परिचारिका हॉस्पिटलचं पाणी पिणार नाही, असं सांगत आहेत. यातील काही परिचारिका घरून पाण्याची बाटली घेऊन कामावर आल्या. हॉस्पिटलच्या पाण्यात असं काहीतरी आहे की, 11 परिचारिका एकाच वेळी गर्भवती झाल्या आहेत. गंमत म्हणून ही अफवा पसवली होती.

पुढे वाचा ...
  नवी दिल्ली, 13 मे : अमेरिकेतील मिसुरी राज्यातील एका रुग्णालयात एक विचित्र प्रकरण समोर आलं आहे. मिसूरी येथील लिबर्टी हॉस्पिटलमध्ये (Liberty Hospital in Missouri) काम करणाऱ्या 11 वैद्यकीय कर्मचारी एकाच वेळी प्रेग्नंट (pregnant) झाल्या आहेत. यामध्ये 10 नर्सेस आणि एका डॉक्टरचा समावेश आहे. विशेष म्हणजे, त्यापैकी दोघींची डिलिव्हरीची संभाव्य तारीख (delivery due date) एकच आहे. योगायोगाने, यातील बहुतांश परिचारिका रुग्णालयातील प्रसूती विभागात (Maternity department) काम करतात. एका संस्थेत एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येनं महिला कर्मचारी गर्भवती राहण्याची ही पहिलीच घटना आहे. सर्व परिचारिका एकमेकींना ओळखत असून एकत्रच काम करणाऱ्या हॉस्पिटलच्या बर्थिंग सेंटरच्या संचालिका निक्की कॉलिंग यांनी सांगितले की, या सर्व परिचारिका एकाच विभागात काम करणाऱ्या आहेत. परंतु त्यापैकी 10 गर्भवती असतील अशी आम्हाला अपेक्षा नव्हती. ते खूपच मजेदार आहे. यातील काही वैद्यकीय कर्मचार्‍यांची प्रसूती पुढील काही आठवड्यांत होईल. तर, उर्वरित परिचारिकांची तारीख सप्टेंबर ते नोव्हेंबर अशी आहे. रुग्णालय प्रशासनाने या सर्व परिचारिकांना स्थानिक कायदा आणि रुग्णालयाच्या नियमांच्या आधारे सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे. गर्भवती नर्स म्हणाली, हॉस्पिटलच्या पाण्याची अफवा आहे 29 वर्षीय नर्स हॅना मिलरने सांगितलं की, मी माझ्या पहिल्या मुलाच्या जन्माबद्दल उत्साहित आहे. ती गमतीने पुढे म्हणाली की, अनेक परिचारिका हॉस्पिटलचं पाणी पिणार नाही, असं सांगत आहेत. यातील काही परिचारिका घरून पाण्याची बाटली घेऊन कामावर आल्या. कोणीतरी गंमतीनं सांगितलं आहे की, हॉस्पिटलच्या पाण्यात असं काहीतरी आहे की, 11 परिचारिका एकाच वेळी गर्भवती झाल्या आहेत. गंमत म्हणून ही अफवा पसवली होती. हे वाचा - Corona मध्ये नोकरी गेली, हार न मानता महिलेनं घर चालवण्यासाठी निवडली वेगळी वाट
   रुग्णालयातील प्रसूती-स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टरही गर्भवती आहेत
  लेबर आणि प्रसूती नर्स केटी बेस्टजेनची प्रसूतीची तारीख 20 जुलै आहे, तर 27 वर्षीय प्रसूती फ्लोट नर्स थेरेसी बायरम नोव्हेंबरच्या अखेरीस आई होणार आहे. क्रिस्टन बर्न्स आणि चेयेन बीटी, दोन 26 वर्षीय लेबर आणि प्रसूती परिचारिका, देखील गर्भवती आहेत. यासोबत प्रसूती-स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अॅना गोरमन, म्हणाल्या की, मला वाटतं की, हे खरोखर खूप जबरदस्त आहे. कारण आपण सर्व एकाच युनिटमध्ये काम करतो. आपल्या दुसऱ्या अपत्याच्या प्रतीक्षेत असलेल्या डॉ. अॅना म्हणाल्या की, इतक्या बाळांचा होणारा जन्म खरोखरच रोमांचक असणार आहे.
  Published by:Digital Desk
  First published:

  Tags: Pregnant, Woman doctor

  पुढील बातम्या