मराठी बातम्या /बातम्या /देश /Corona मध्ये नोकरी गेली, हार न मानता महिलेनं घर चालवण्यासाठी निवडली वेगळी वाट

Corona मध्ये नोकरी गेली, हार न मानता महिलेनं घर चालवण्यासाठी निवडली वेगळी वाट

लोक बहुतेक सोशल मीडिया साइट Linkedin वर नोकऱ्या शोधत असताना, बरेच लोक स्वतःच स्वतःचा मार्ग निवडतात. अशा लोकांच्या कथा इतरांसाठी प्रेरणादायी (motivational stories on Indians) असतात.

लोक बहुतेक सोशल मीडिया साइट Linkedin वर नोकऱ्या शोधत असताना, बरेच लोक स्वतःच स्वतःचा मार्ग निवडतात. अशा लोकांच्या कथा इतरांसाठी प्रेरणादायी (motivational stories on Indians) असतात.

लोक बहुतेक सोशल मीडिया साइट Linkedin वर नोकऱ्या शोधत असताना, बरेच लोक स्वतःच स्वतःचा मार्ग निवडतात. अशा लोकांच्या कथा इतरांसाठी प्रेरणादायी (motivational stories on Indians) असतात.

कोलकाता, 13 मे : कोरोनाची (Corona) साथ अजूनही पूर्णपणे संपलेली नाही. भारतासह अनेक देशांमध्ये या महामारीने (Coronavirus pandemic) आपले पाय पसरले आहेत. मात्र, त्याची तीव्रता बरीच कमी झाली आहे. दररोज 2-3 हजार कोविड प्रकरणे (daily covid cases in India) समोर येत आहेत. कोविडमुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे, तर दुसरीकडे अनेकांना रोजीरोटीही गमवावी लागली आहे. त्यामुळे त्याचा फटका त्यांच्या कुटुंबीयांनाही सहन करावा लागला. तथापि, बर्‍याच लोकांनी नोकरी जाणं (Jobs lost in covid) कमजोरी किंवा कठीण मानले नाही आणि हार न मानता त्याचा सामना केला. अशाच पद्धतीने नोकरी गेल्यानंतर एका महिलेने उबेरवर बाईक टॅक्सी (Indian woman started riding Uber bike after job lost in lockdown) सुरू केली. हे काम निवडल्याबद्दल तिचं कौतुक केलं जात आहे.

तसं पाहिलं तर रिक्षा/टॅक्सी चालवणं, ओला-उबेरवर रिक्षा, टॅक्सी आणि विशेषतः बाईकचं रजिस्ट्रेशन केलेले पुरुषच मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र, या महिलेनं या व्यवसायात येत नवीन रस्त्यावर पाऊल टाकलं आहे.

woman lost job in covid lockdown start riding bike

(फोटो: LinkedIn/Ranabir Bhattacharyyaa)

लोक बहुतेक सोशल मीडिया साइट Linkedin वर नोकऱ्या शोधत असताना, बरेच लोक स्वतःच स्वतःचा मार्ग निवडतात. अशा लोकांच्या कथा इतरांसाठी प्रेरणादायी (motivational stories on Indians) असतात. रणबीर भट्टाचार्य नावाच्या लेखकानं अशाच एका महिलेविषयीची प्रेरणादायी पोस्ट शेअर केली आहे. रणबीर यांनी एका महिलेसोबत फोटो टाकला आणि सांगितलं की कोविडच्या काळात नोकरी गमावल्यानंतरही तिने कशी हार मानली नाही (Woman started riding uber bike to support family after job loss) आणि कुटुंब चालवलं.

हे वाचा - Air India ने बोर्डिंगसाठी दिला नकार; महिलेला विमानतळावरच आला पॅनिक अटॅक, Video

हार न मानणारा लढाऊ बाणा इतरांसाठीही प्रेरणादायक

रणबीर यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलं- “आज मी उबेर मोटोद्वारे शहरात जाण्यासाठी बाईक बुक केली, त्यामुळे माझी मौतुशी बसू (Moutushi Basu) नावाच्या महिलेशी भेट झाली. ती 30 वर्षांची आहे. ती कोलकात्यापासून काही अंतरावर असलेल्या बरुईपूरमध्ये राहते. लॉकडाऊनपूर्वी ती Panasonic कंपनीत काम करत होती. पण लाखो भारतीयांप्रमाणे तिलाही कोविडच्या काळात नोकरी गमवावी लागली. आज पाऊस पडत असतानाही तिने माझ्याकडे एक रुपयाही जादा मागितला नाही. जेव्हा मी तिला विचारलं की, पावसाळ्यात कोलकात्यातील रस्त्यावर दुचाकी चालवण्याचा त्याचा अनुभव कसा होता, तेव्हा तिने सांगितलं की घर चालवण्यासाठी पैसे कमवण्याचा दुसरा कोणताही मार्ग माझ्याकडे नाही. देव तिला आशीर्वाद देवो."

हे वाचा - ड्रग्सच्या अतिसेवनाने 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू; मित्रांनीच पुरला मृतदेह आणि...

लोकांनी मदतीचा हात पुढे केला

ही प्रेरणादायी पोस्ट वाचल्यानंतर लोकांनी या महिलेचं केवळ कौतुकच केले नाही तर, या महिलेची सोशल मीडिया वापरकर्त्यांना ओळख करून देणाऱ्या रणबीरचंही कौतुक केले. आता लोक त्या महिलेला मोठ्या प्रमाणावर मदत करण्यास तयार आहेत. अनेकांनी तिच्यासोबत प्रवासही केल्याचं सांगितलं. तर, अनेक लोक महिलेबद्दल अधिक माहिती विचारत आहेत जेणेकरून तिला मदत व्हावी आणि नोकरी मिळावी.

First published:

Tags: Bike riding, Motivation