महाड शहरालगत असणाऱ्या नडगांव येथिल महामार्ग परिसरात आज संध्याकाळी दरड कोसळली.पावसाची संततधार आणि भुसभुशीत झालेल्या मातीमुळे या परीसरात महामार्गावर एका ठिकाणी दरड कोसळली. दरड कोसळल्याने वाहतूक काही काळ ठप्प पडली होती.मात्र वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे दरड हटवून वाहतूक पुन्हा सूरू करण्यात आली आहे.